Join us  

सातत्य राखणे सर्वात महत्त्वाचे - तेंडुलकर

जर कुणी डावाची सुरुवात करण्यास इच्छुक असेल तर त्याची मानसिकता वेगळ्या पद्धतीची असायला हवी, असे सचिन म्हणाला.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2019 11:47 PM

Open in App

नवी दिल्ली : कसोटी क्रिकेटमध्ये सलामीवीराच्या भूमिकेसाठी वेगळ्या मानसिकतेची गरज असते. प्रतिभेला कामगिरीत बदलून त्यात सातत्य राखणे सर्वांत महत्त्वाचे ठरते, असे मत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने व्यक्त केले.द. आफ्रिकेविरुद्ध पहिल्या कसोटीत सलामीवीर फलंदाजाच्या भूमिकेत रोहित शर्मा संघव्यवस्थापनाचे वीरेंद्र सेहवाग मॉडेल यशस्वी ठरल्यानंतर तेंडुलकर म्हणाला की, ह्यक्रिकेटच्या या पारंपरिक स्वरुपात नव्या चेंडूला सामोरे जाताना सकारात्मक मानसिकता आवश्यक ठरते. हे सर्वकाही मानसिकतेवर अवलंबून आहे. जर कुणी डावाची सुरुवात करण्यास इच्छुक असेल तर त्याची मानसिकता वेगळ्या पद्धतीची असायला हवी.

टॅग्स :सचिन तेंडुलकररोहित शर्माविरेंद्र सेहवाग