Join us  

महेंद्रसिंग धोनी जगातील सर्वोत्कृष्ट फिनिशर, ऑस्ट्रेलियाच्या दिग्गजाकडून कौतुक

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या 'फिनिशिंग टच'बद्दल टीकाकारांनी बरीच टीका केली. मात्र, धोनीने ऑस्ट्रेलियात वन डे मालिकेत आपली जादू दाखवली.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2019 10:12 AM

Open in App
ठळक मुद्देऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत धोनीचे सलग तीन अर्धशतकंभारताच्या मालिका विजयात धोनीचा सिंहाचा वाटा

मेलबर्न : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या 'फिनिशिंग टच'बद्दल टीकाकारांनी बरीच टीका केली. मात्र, धोनीने ऑस्ट्रेलियात वन डे मालिकेत आपली जादू दाखवली. त्याच्या उपयुक्त खेळीच्या जोरावर भारताने वन डे मालिका 2-1 अशी जिंकली. त्याने आपल्या कामगिरीतून टीकाकारांना सडेतोड उत्तर दिले. ऑस्ट्रेलियाचे दिग्गज खेळाडू इयान चॅपेल यांनीही धोनीचे कौतुक केले आणि वन डे क्रिकेटमध्ये तो आजही सर्वोत्कृष्ट फिनिशर असल्याचे मत व्यक्त केले.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन डे मालिकेत धोनीने सलग तीन अर्धशतक झळकावली. त्याला या मालिकेत मॅन ऑफ दी सीरिज म्हणून गौरविण्यात आले. भारताने प्रथमच ऑस्ट्रेलियात द्विदेशीय मालिका जिंकण्याचा पराक्रम केला. या मालिकेतील धोनीच्या कामगिरीचे चॅपेल यांनी कौतुक केले. ते म्हणाले,''समजूतीने खेळ करून सामना जिंकून देण्याची धोनीकडे असलेली क्षमता अन्य कोणत्याही खेळाडूकडे नाही. संघ कठीण परिस्थितीत असतानाही तो संयमाने खेळत राहीला. त्याने मोठे फटके मारण्यासाठी थोडा वेळ घेतला, परंतु त्याने भारताला विजय मिळवून दिले.''

सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या खेळाडूंमध्ये ऑस्ट्रेलियाच्या मायकेल बेव्हन हा अग्रणीवर आहे, परंतु चॅपेल यांनी धोनीने बेव्हनलाही मागे टाकले असे मत व्यक्त केले. ''बेव्हन सामन्याचा शेवट चौकार मारून करायचा, परंतु धोनी षटकारच खेचतो. धावा घेण्याच्या बाबतीत बेव्हन आघाडीवर आहे, परंतु 37 व्या वर्षीही धोनीची चपळता थक्क करणारी आहे. धोनी हा वन डेतील सर्वोकृष्ट फिनिशर आहे,'' असे चॅपेल म्हणाले.   

टॅग्स :महेंद्रसिंह धोनीबीसीसीआय