Join us  

महेंद्रसिंग धोनीला दिला भारतीय संघातून डच्चू? जानेवारीत करणार होता पुनरागमन...

... त्यामुळे धोनीला भारतीय संघातून डच्चू दिला का, या चर्चांना उत आला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2019 7:47 PM

Open in App

मुंबई : जानेवारीमध्ये होणाऱ्या श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिकांसाठी भारताचा संघ जाहीर करण्यात आला आहे. या संघांमध्ये भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचे नाव पाहायला मिळाले नाही. त्यामुळे धोनीला भारतीय संघातून डच्चू दिला का, या चर्चांना उत आला आहे.

इंग्लंड येथे झालेल्या विश्वचषकानंतर धोनीने एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. जेव्हा धोनीला याबाबत विचारण्यात आले होते, तेव्हा मला या वर्षात तरी काही विचारू नका, जानेवारीपर्यंत वाट पाहा, असे म्हटले होते.

आगामी ट्वेन्टी-२० विश्वचषक पाहता धोनीला संघातून दूर ठेवण्यात आले असून रिषभ पंतला संधी देण्यात आली आहे. त्यामुळे श्रीलंकेविरुद्धच्या ट्वेन्टी-२० सामन्यांच्या मालिकेत धोनीला संधी देण्यात आली नाही, हे समजण्यात येऊ शकते. पण ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारत तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेतही धोनीला स्थान देण्यात आलेले नाही. त्यामुळे धोनीला भारतीय संघातून डच्चू देण्यात आला आहे का, हा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

धोनीला संघात पुनरागमन करायचे असेल तर 'ही' गोष्ट करावी लागेल, सांगतायत निवड समिती अध्यक्ष प्रसाद

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी सध्या क्रिकेटपासून लांब आहे. इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषकानंतर धोनीने एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. पण धोनीला जर भारतीय संघात पुनरागमन करायचे असेल, तर त्याला एक गोष्ट करावी लागेल, असे निवड समिती अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी स्पष्ट केले आहे.

न्यूझीलंडच्या दौऱ्यात धोनी पुनरागमन करू शकतो, असे म्हटले जात आहे. या दौऱ्यात भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या पुनरागमन करणार असल्याचे संकेत प्रसाद यांनी दिले आहेत. पण त्याचबरोबर धोनीच्या पुनरागमन करण्यातबाबतही त्यांनी आपले मत व्यक्त केले आहे.

प्रसाद म्हणाले की, " हार्दिक सध्याच्या घडीला दुखापतीमधून सावरत आहे. न्यूझीलंडच्या दौऱ्याला २४ जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. त्यामुळे हार्दिकबाबतचा निर्णय आम्ही जानोवारीच्या तिसऱ्या आठवड्यात घेणार आहोत."

धोनीबाबत प्रसाद म्हणाले की, " धोनीच्या पुनरागमनाबाबत मी कोणतेही भाष्य करू इच्छित नाही. धोनीला जर भारतीय संघात पुनरागमन करायचे असेल तर त्याने स्थानिक सामन्यांमध्ये खेळायला हवे."

टॅग्स :महेंद्रसिंग धोनीरिषभ पंत