- आप्पासाहेब पाटील
सोलापूर : येथील प्रसिद्ध इंदिरा गांधी आजपासून सुरू झालेल्या शेवटच्या रणजी सामन्यात पहिल्या दिवस अखेरीला खेळ थांबला तेंव्हा त्रिपुरा संघाने पहिल्या डावात ९० षटकात ५ बाद २३० धावा केल्या असून यष्टिरक्षक शरथ ६६ धावांवरती खेळत आहे. त्याच्या सोबतीला रजत डे नाबाद १८ वर आहे.
सकाळी महाराष्ट्र कर्णधार अंकित ने उडवलेला टॉस, नाणेफेक जिंकून त्रिपुरा कर्णधार मनदीप सिंग ने प्रथम फलंदाजी घेतली. सलामीवीर बिक्रम कुमार दास व तेजस्वी जयस्वाल यांनी १९ षटके खेळत ६८ धावा केल्या असताना तेजस्वी जयस्वाल (२३) ला सिद्धेश विर ने पवन शहा करवी झेलबाद केले. त्याच्यानंतर पुढच्याच षटकात श्रिदाम पॉल (१) हितेश वाळुंज कडून त्रिफळाचीत झाला. त्यानंतर माजी भारतीय खेळाडू असलेला कर्णधार मनदीप सिंग फलंदाजीला आला पण पुढील ४ च षटकात बिक्रम दास (३९) देखील हितेश चा शिकार ठरला, त्याचा झेल स्लीप मध्ये सिद्धेश वीर ने घेतला. जेवणाला खेळ थांबला ठेवणं १०१/३ (३४) धावसंख्या होती.
पुन्हा खेळ सुरू झाल्या झाल्या ५ षटक नंतर कर्णधार मनदीप सिंग ला रामकृष्ण घोष ने वीर कडे झेल देण्यास भाग पाडले आणि मागील सामन्यात १०० हुन अधिक धावा करणाऱ्या मनदीपचा महत्त्वाचा बळी मिळविला. चहापानाच्या वेळी खेळ थांबला तेंव्हा १५३/४ (६०) नंतर पुढील जोडी रियाझ उद्दएन (२६) व यष्टीरक्षक फलंदाज शरथ ने महाराष्ट्राची भेदक गोलंदाजी खेळून काढत ५ व्या गड्यासाठी ८२ धावांची भागीदारी केली. १८८ धावांवर रियाझ हा वाळुंज कडून बाद झाला. त्यानंतर आलेल्या रजत सोबत किल्ला लढवत शरथ ने अर्धशतक साजरे केले आणि २३०/५ (९०) धावा झाल्यावर पंचांनी पहिल्या दिवशीचा खेळ थांबविला.