Join us  

महाराजचा पराक्रम, 61 वर्षांनंतर द. आफ्रिकेचा गोलंदाजाने केला विक्रम 

फिरकी गोलंदाज केशव महाराज याने कसोटी क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिकेसाठी 1957 नंतरची सर्वोत्तम कामगिरी करण्याचा पराक्रम केला.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2018 4:18 PM

Open in App

कोलंबो - फिरकी गोलंदाज केशव महाराज याने कसोटी क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिकेसाठी 1957 नंतरची सर्वोत्तम कामगिरी करण्याचा पराक्रम केला. त्याने श्रीलंकेविरूद्धच्या दुस-या कसोटी सामन्यात 129 चेंडूंत 9 विकेट्स घेतल्या. अथक प्रयत्नानंतर त्याला अखेरची विकेट मिळवण्यात यश प्राप्त झाले. रंगना हेरथ आणि अकिला धनंजया यांनी 10व्या विकेटसाठी केलेल्या 74  धावांची भागिदारी त्याने संपुष्टात आणली. दक्षिण आफ्रिकेसाठी एका डावात 9 विकेट्स घेणारा तो दुसरा गोलंदाज ठरला. द. आफ्रिकेच्या गोलंदाजांची कसोटीतील सर्वोत्तम कामगिरीह्यूज टेयफिल्ड - 9/113 वि. इंग्लंड, जोहान्सबर्ग 1957केशव महाराज - 9/129 वि. श्रीलंका, कोलंबो 2018गॉडफ्रे लॉरेन्स - 8/53 वि. न्यूझीलंड, जोहान्सबर्ग 1961लान्स क्युजनर - 8/64 वि. भारत, कोलकाता 1996ह्यूज टेयफिल्ड - 8/69 वि. इंग्लंड, डर्बन 1957टिप स्नूक - 8/70 वि. इंग्लंड, जोहान्सबर्ग 1906अॅलन डोनाल्ड - 8/71 वि. झिम्बाब्वे, हरारे 1995 महाराजच्या या विक्रमी कामगिरीवर आफ्रिकेच्या फलंदाजांनी पाणी फेरले. श्रीलंकेच्या पहिल्या डावातील 338 धावांच्या उत्तरात आफ्रिकेचा पहिला डाव 124 धावांवर गडगडला. 

टॅग्स :द. आफ्रिकाक्रिकेटक्रीडा