Join us  

ट्वेंटी-२० वर्ल्ड कप आयोजन संकटात; अनेक बोर्ड भारतात येण्यास घाबरत आहेत, UAEचा विचार करा!

कोरोनाला रोखण्यासाठी बीसीसीआयनं तयार केलेला बायो-बबल फुटला अन् आयपीएलमध्ये सहभागी झालेले खेळाडू एकामागून एक पॉझिटिव्ह आढळले.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2021 12:11 PM

Open in App

कोरोनाला रोखण्यासाठी बीसीसीआयनं तयार केलेला बायो-बबल फुटला अन् आयपीएलमध्ये सहभागी झालेले खेळाडू एकामागून एक पॉझिटिव्ह आढळले. त्यानंतर बीसीसीआयनं आयपीएल २०२१ स्थगित करण्याचा निर्णय घेतला. बीसीसीआयच्या या निर्णयानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबर या कालावधीत होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धा नियोजनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. ही स्पर्धा भारतातच खेळवण्यात यावी, यासाठी बीसीसीआयनं २९ तारखेला महत्त्वाची बैठक बोलावली आहे. ट्वेंटी-२० वर्ल्ड कपसाठी यूएई ( UAE) हा दुसरा पर्याय बीसीसीआयसमोर आहे आणि आयसीसीही त्यासाठी सकारात्मक आहे. पण, बीसीसीआयचं टेंशन वाढवणारं विधान ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज मायकेल हसी ( Michael Hussey ) यानं केलं आहे. बीसीसीआय पुरुष क्रिकेटपटूंना देते वर्षाला ७ कोटी, तर महिला खेळाडूंना ५० लाख!

भारतात यावर्षी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप होणं अवघड आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे रुग्णांची संख्या वाढत आहे आणि मृतांचा आकडाही वाढत आहे, असे मत ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज हसीनं व्यक्त केले. आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सचा मुख्य प्रशिक्षक असलेला हसी नुकताच मायदेशात परतला. त्यालाही कोरोनाची लागण झाली होती आणि त्यातून तो बरा झाला आहे. तो सध्या सिडनीत क्वारंटाईन कालावधी पूर्ण करत आहे. त्यानं ट्वेंटी-२० वर्ल्ड कपसाठी यूएई हाच योग्य पर्याय असल्याचे मत व्यक्त केले.  Breaking: टीम इंडिया ऑस्ट्रेलियात ऐतिहासिक डे-नाईट सामना खेळणार; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

''माझ्यामते भारतात ट्वेंटी-२० वर्ल्ड कपचे आयोजन होणे अवघड आहे. आम्ही आठ संघांसह येथे आयपीएल खेळलो. पण, ट्वेंटी-२० स्पर्धेसाठी संघसंख्या अधिक असणार आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी सामने खेळवावे लागतील. मी आधीपण सांगितले आहे की जर आपण वेगवेगळ्या शहरांत खेळणार असू, तर धोकाही तितकाच वाढेल,''असे हसीनं Fox Cricketला  सांगितले. तो पुढे म्हणाला,''माझ्यामते तेही हाच विचार करत असतील आणि यूएई किंवा अन्य कोणत्यातरी देशाचा वर्ल्ड कप आयोजनासाठीचा पर्याय खुला ठेवला असेल. जगभरातील अनेक क्रिकेट मंडळं सद्यस्थितीत भारतात येण्यासाठी घाबरत आहेत.''कोरोनामुळे मोठी स्पर्धा रद्द झाली, भारत-पाकिस्तान सामन्याची प्रतीक्षा लांबली!

बीसीसीआयनं ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी अहमदाबाद, मुंबई, कोलकाता, नवी दिल्ली, बंगळुरू, हैदराबाद, चेन्नई, धर्मशाला आणि लखनौ या शहरांची निवड केली होती. पण, अंतिम निर्णय हा आयसीसीच्या पाहणी दौऱ्यानंतर घेतला जाईल.    

टॅग्स :आयसीसी विश्वचषक टी-२०चेन्नई सुपर किंग्सकोरोना वायरस बातम्या