Join us

सुमार कामगिरीमुळेच मालिका गमावली : कोहली

बुधवारी दुसऱ्या टी२० त ऑस्ट्रेलियाने भारताला ७ गड्यांनी सहज नमविले.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2019 06:23 IST

Open in App

बेंगळुरू : ‘ऑस्ट्रेलियाचा संघ सर्वच आघाड्यांवर आमच्या तुलनेत वरचढ ठरला. गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण तिन्हींमध्ये आम्ही सुमार कामगिरी केली. त्याचा फटका बसला. ही मालिका लहान होती त्यामुळे निष्कर्ष सांगणे कठीण असले, तरी आॅस्ट्रेलियाने ज्या पद्धतीचा खेळ केला, त्यानुसार त्यांचा विजय होणे निश्चित होते,’ अशा शब्दात कर्णधार विराट कोहली याने टी२० मालिकेतील पराभवाचे विश्लेषण केले.

बुधवारी दुसऱ्या टी२० त आॅस्ट्रेलियाने भारताला ७ गड्यांनी सहज नमविले. ग्लेन मॅक्सवेलने नाबाद वादळी शतक (११३) ठोकून सहज विजय मिळवून दिला. आम्ही दिलेले १९१ धावांचे मोठे लक्ष्य मॅक्सवेलच्या खेळीपुढे लहान ठरले असे सांगून विराट म्हणाला,‘आम्ही मालिका गमावली कारण टी२० मध्ये कोणत्याही मैदानावर १९० ही स्पर्धात्मक तसेच बचावात्मक धावसंख्या आहे. या धावसंख्येचा पाठलाग करणाऱ्या मॅक्सवेलने गोलंदाजांना हतबल केले होते.वरच्या क्रमावर फलंदाजी करणे आवडेल - मॅक्सवेलबेंगळुरू: चौथ्या स्थानावर येऊन दणादण शतकी खेळी करणारा ग्लेन मॅक्सवेल याने ‘भारताविरुद्ध आगामी पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत आॅस्ट्रेलियासाठी वरच्या स्थानावर फलंदाजी करणे आवडेल,’ अशी इच्छा व्यक्त केली आहे. ग्लेन एकदिवसीय सामन्यात सातव्या स्थानावर फलंदाजीला येतो. ३० वर्षांचा मॅक्सवेल म्हणाला,‘दुसºया टी२० बद्दल बोलायचे तर १५ षटकांचा खेळ शिल्लक असताना खेळपट्टीवर आलो. मी नाबाद राहून सामना संपविला. सातव्या किंवा आठव्या स्थानावर हे काम शक्य होऊ शकले नसते. मी मिळालेल्या संधीचा लाभ घेण्यात तरबेज आहे.’वादामुळे डच्चू मिळताच विनम्र बनलो - राहुलएका टीव्ही शोदरम्यान महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी हार्दिक पांड्या व लोकेश राहुल यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली होती. ही बंदी उठवल्यानंतर राहुलला भारत अ संघाकडून खेळण्याची संधी मिळाली. ‘आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून मी थोडा वेळ बाहेर होतो, मी नेमका कुठे चुकलो, याकडे लक्ष देण्यासाठी वेळ मिळाल्याने अधिक विनम्र बनलो,’ असे राहुलने म्हटले. तो म्हणाला, ‘ती वेळ कठीण होती. कठीण परिस्थितीतून जाताना संयम राखणे गरजेचे असते. या काळात मी राहुल द्रविड सरांच्या मार्गर्शनाखाली खेळावर लक्ष केंद्रित करुन चुकांही सुधारल्या.’