पाहा विराट कोहलीचा हा नवीन लूक

भारतात आल्यावर लगेचच कोहलीने आपला नवीन लूक जाहीर केला आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2019 08:35 PM2019-09-10T20:35:30+5:302019-09-10T20:36:50+5:30

whatsapp join usJoin us
Look at this new look of Virat Kohli | पाहा विराट कोहलीचा हा नवीन लूक

पाहा विराट कोहलीचा हा नवीन लूक

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली : भारताचा कर्णधार विराट कोहली हा आपल्या लूकसाठीही प्रसिद्ध आहे. वेस्ट इंडिज दौऱ्यावरून कोहली आज आपली पत्नी अनुष्का शर्माबरोबर परतला. भारतात आल्यावर लगेचच कोहलीने आपला नवीन लूक जाहीर केला आहे. 

भारताचा कर्णधार विराट कोहली हा फक्त क्रिकेटसाठी ओळखला जात नाही, तर तो आपल्या स्टाइलसाठीही ओळखला जातो. आता तर विराट चर्चेत आला आहे ते आपल्या महागड्या घड्याळ्यामुळे. विराटच्या या घड्याळ्यामध्ये सोन्यासहीत काही हिरे, माणिक असल्याचीही चर्चा आहे. वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावरून कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा आज भारतात दाखल झाले.

 भारताने वेस्ट इंडिजवर कसोटी मालिकेत 2-0 असा दणदणीत विजय मिळवला. या विजयानंतर कोहलीने भारताकडून सर्वाधिक सामने जिंकण्याचा इतिहास रचला. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने सहजच विजय मिळवला. भारताने दुसऱ्या डावात वेस्ट इंडिजचा संघ 210 धावांवर संपुष्टात आणला. त्यामुळे, 257 धावांनी विजय मिळवत दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताने 2-0 ने कसोटी मालिका जिंकली.

कोहलीच्या घड्याळाची किंमत नेमकी किती, हा प्रश्न आता तुम्हाला पडला असेल. कोहली जे घड्याळ घालतोय त्याची किंमत जवळपास ७० लाख रुपये असल्याचे म्हटले जात आहे. भारतातील खेळाडूंमध्ये सर्वात जास्त किंमतीचे घड्याळ कोहलीकडे असल्याचे म्हटले जात आहे.

विराट कोहलीने रचला इतिहास; ठरला सर्वोत्तम कर्णधार
भारताचा कर्णधार विराट कोहलीने वेस्ट इंडिजच्या धर्तीवर इतिहास रचला आहे. कारण अशी कामगिरी करणारा तो भारताचा सर्वोत्तम कर्णधार ठरला आहे. कारण कोहलीसारखी कामगिरी भारताच्या एकाही कर्णधाराला करणे जमलेले नाही.

कोहलीनं परदेशात सर्वाधिक विजय मिळवणाऱ्या भारतीय कर्णधारांत गांगुलीला ( 11 विजय)  मागे टाकले आहे. कोहलीनं 27 सामन्यांत 13 विजय मिळवले आहेत. धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने परदेशात सहा कसोटी सामने जिंकण्याचा पराक्रम केला होता. शिवाय भारतीय कर्णधार म्हणून सर्वाधिक कसोटी विजय आता कोहलीच्या नावावर आहेत. कोहलीच्या नावावर आता 28 कसोटी विजय आहेत आणि कोहलीने धोनीला (27 विजय) पिछाडीवर सोडले आहे. कोहलीनं 48 कसोटीत हा पराक्रम केला आणि धोनीपेक्षा 12 सामने कमी खेळून त्याने ही मजल मारली आहे.

Web Title: Look at this new look of Virat Kohli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.