Join us  

आयपीएल होणार की नाही? टीम इंडियाचा यष्टिरक्षक म्हणाला, आयुष्य अन् कुटुंब महत्त्वाचे...

इंडियन प्रीमिअर लीग ( आयपीएल 2020) 13वे मोसम होईल की नाही, हेही अजूनपर्यंत निश्चित नाही. मंगळवारी याबाबतचा महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2020 4:57 PM

Open in App

संपूर्ण जग कोरोना व्हायरसच्या विळख्यात सापडला आहे. आतापर्यंत मृतांचा आकडा 13 हजाराच्या आसपास गेल्याचं वृत्त आहे. त्यामुळे अनेक क्रीडा स्पर्धा रद्द किंवा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. इंडियन प्रीमिअर लीग ( आयपीएल 2020) 13वे मोसम होईल की नाही, हेही अजूनपर्यंत निश्चित नाही. सध्या तरी ही स्पर्धा 15 एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. तरीही या लीगवर अनिश्चिततेचं सावट आहे. त्यात भारतीय संघाच्या यष्टिरक्षकानं आयपीएलच्या 13व्या मोसमाबद्दल महत्त्वाचं विधान केलं आहे.

Video : कोरोना व्हायरसमुळे घरीच थांबला अन् पत्नीनं घेतली शाळा; पाहा इंग्लंडच्या खेळाडूची कसरत

कोरोना व्हायरसमुळे  इंडियन प्रीमिअर लीगचे ( आयपीएल 2020) 13 वे मोसम होईल की नाही यावरही प्रश्नचिन्ह आहे. 29 मार्चला सुरु होणारी ही लीग 15 एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय काही दिवासांपूर्वी बीसीसीआयनं घेतला.  त्यानंतर संघ मालक आणि बीसीसीआय यांच्यात वारंवार चर्चा होताना दिसत आहे. आयपीएल न होणे हे बीसीसीआय आणि फ्रँचायझी यांच्यासह ब्रॉडकास्टर यांच्यासाठी मोठा आर्थिक नुकसान होणार आहे. तरीही बीसीसीआय आणि फ्रँचायझी मालक यांनी लोकांच्या सुरक्षेवर अधिक भर दिल्याचे सध्यातरी पाहायला मिळत आहे. सध्याची देशातील परिस्थिती पाहता कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव झपाट्यानं वाढत चालला आहे. या पार्श्वभूमीवर 24 मार्चला म्हणजेच उद्या बीसीसीसीआय आणि फ्रँचायझी मालक यांच्यात कॉन्फरन्स कॉल होणार आहे.  

सुरेश रैनानं केलं बाळाचं बारसं; जाणून घ्या मुलाचं नाव काय ठेवलं  

भारतीय कसोटी संघाचा यष्टिरक्षक वृद्धीमान साहा म्हणाला,''आयुष्य आणि कुटुंब सर्वप्रथम. त्यानंतर तुम्ही खेळाबाबत बोला. खेळासाठी आम्ही अनेक त्याग केले आहेत, परंतु आता जर अनेकांना त्यामुळे आजाराचा सामना करावा लागत असेल, तर खेळाची सध्या गरज नाही. त्यामुळे आपण योग्य ती काळजी घ्यायला हवी.  वेळ जाऊदे, परिस्थिती सुधारल्यानंतर आपण आयपीएलबाबत चर्चा करू.'' 

अन्य महत्त्वाच्या बातम्या

इंग्लंडच्या जोफ्रा आर्चरची भविष्यवाणी खरी ठरली? सहा वर्षांपूर्वी केलेलं ट्विट व्हायरल

IPL 2020 चा अंतिम फैसला उद्या; 'या' पर्यायांपैकी एकाची होईल निवड

पंतप्रधान मोदीजी 'जनता कर्फ्यू'त तुम्ही 5 वाजता काय केलं? ऑलिम्पिक पदक विजेत्या खेळाडूचा सवाल

Good News : सुरेश रैनाच्या घरी पाळणा हलला, पुत्ररत्न प्राप्ती झाली

Video : रोहित शर्माचा कन्येसोबत रंगला क्रिकेट सामना, पाहा कोण जिंकलं 

शाहिद आफ्रिदी गरजूंना पुरवतोय रेशन; पाकिस्तानी जनतेला केलं आवाहन

 

टॅग्स :वृद्धिमान साहाआयपीएल 2020कोरोना वायरस बातम्या