Join us  

Rishabh Pant, LEI vs IND : रिषभ पंतने भारतीय गोलंदाजांना धुतले, अर्धशतकी खेळीत १० चेंडूत कुटल्या ४२ धावा

लिसेस्टरशायर क्लबचे प्रतिनिधित्व करणाऱ्या रिषभने चांगली फटकेबाजी करताना अर्धशतक झळकावले आणि डाव सावरला.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2022 6:56 PM

Open in App

LEI vs IND : इंग्लंडचा सामना करण्यापूर्वी सुरू असलेल्या सराव सामन्यात रिषभ पंतने ( Rishabh Pant) भारतीय गोलंदाजांच्या मर्यादा स्पष्ट केल्या. लिसेस्टरशायर क्लबचे प्रतिनिधित्व करणाऱ्या रिषभने चांगली फटकेबाजी करताना अर्धशतक झळकावले आणि डाव सावरला.  चार दिवसीय सराव सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाची अवस्था पहिल्या दिवशी ८ बाद २४६ अशी झाली. केएस भरतने नाबाद ७० धावा करताना लिसेस्टरशायरच्या गोलंदाजांना आव्हान दिले. विराट कोहलीही चांगल्या फॉर्मात दिसला, परंतु ३३ धावांवर तो LBW झाला. शुबमन गिल ( २१), रोहित शर्मा ( २५), श्रेयस अय्यर ( ०), रवींद्र जडेजा ( १३) व विराट कोहली ( ३३) हे माघारी परतल्यानंतर केएस भरत व उमेश यादव यांनी झटपट ६६ धावांची भागीदारी करताना भारताला दोनशेपार नेले. शमी १८ धावांवर नाबाद राहिला, तर भरतने १११ चेंडूंत ८ चौकार व १ षटकारासह नाबाद ७० धावा केल्या.

प्रत्युत्तरात मैदानावर उतरलेल्या लिसेस्टरशायरला शमीने २२ धावांवर दोन धक्के दिले. कर्णधार  सॅम इव्हान्स ( १) याला सातव्या षटकांत बाद केले. त्यानंतर ९व्या षटकात शमीने लिसेस्टरशायरकडून खेळणाऱ्या चेतेश्वर पुजाराचा ( Cheteshwar Pujara) त्रिफळा उडवला. त्यानंतर मोहम्मद सिराजने दोन धक्के देताना लिसेस्टरशायरची अवस्था ४ बाद ८० अशी केली आहे. रिषभ पंत व रिषी पटेल यांनी पाचव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करताना डाव सावरला. शमीने ही जोडी तोडली अन् पटेल ३४ धावांवर माघारी परतला. शार्दूल ठाकूरने लिसेस्टरच्या स‌ॅम बॅट्सला ( ८) बाद केले.रिषभने ७३ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. त्याने ५३ धावांच्या खेळीत ९ चौकार व १ षटकार खेचले. 

 

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडरिषभ पंत
Open in App