Legends League Cricket : वीरेंद्र सेहवाग Indian Maharajaचा कर्णधार; आशियाई संघाचे नेतृत्व मिसबाह उल हक सांभाळणार!

Legends League Cricket: सेहवागनं यापूर्वी दिल्ली कॅपिटल्स आणि किंग्स इलेव्हन पंजाब या इंडियन प्रीमिअर लीगमधील संघाचे कर्णधारपद सांभाळले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2022 08:35 PM2022-01-18T20:35:22+5:302022-01-18T20:35:45+5:30

whatsapp join usJoin us
Legends League Cricket: Virender Sehwag to captain Indian Maharaja side; Misbah Ul Haq will lead Asia Lions team | Legends League Cricket : वीरेंद्र सेहवाग Indian Maharajaचा कर्णधार; आशियाई संघाचे नेतृत्व मिसबाह उल हक सांभाळणार!

Legends League Cricket : वीरेंद्र सेहवाग Indian Maharajaचा कर्णधार; आशियाई संघाचे नेतृत्व मिसबाह उल हक सांभाळणार!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Legends League Cricket: भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग ( Virendser Sehwag) याच्याकडे आगामी Legends League Cricket T20 लीग स्पर्धेतील इंडियन महाराजा ( Indian Maharaja) संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. २० जानेवारीपासून ओमान येथील मस्कट क्रिकेट स्टेडियमवर ही लीग खेळवण्यात येणार आहे. सेहवागनं यापूर्वी दिल्ली कॅपिटल्स आणि किंग्स इलेव्हन पंजाब या इंडियन प्रीमिअर लीगमधील संघाचे कर्णधारपद सांभाळले आहे. मोहम्मद कैफवर उप कर्णधारपदाची जबाबदारी असेल, तर ऑस्ट्रेलियाचे वर्ल्ड कप विजेते प्रशिक्षक जॉन बुचानन हे इंडियन महाराजा संघाचे प्रशिक्षक असतील.


दरम्यान, पाकिस्तानचा माजी कर्णधार मिसबाह उल हक हा आशियाई लायन्स संघाचे कर्णधारपद भूषविणार आहे. पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान संघाचे खेळाडू मिळून आशियाई लायन्स संघ तयार केला गेला आहे. शाहिद आफ्रिदी, शोएब अख्तर, मोहम्मद हाफिज, उमर गुल, सनथ जयसूर्या, तिलकरत्ने दिलशान आदी काही प्रमुख खेळाडू या संघात दिसतील. दिलशान हा उप कर्णधार असेल आणि १९९६च्या वर्ल्ड कप विजेत्या संघाचा कर्णधार अर्जुन रणतुंगा या संघाला मार्गदर्शन करतील.  वर्ल्ड जायंट्स संघाचे कर्णधारपद वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार डॅरेन सॅमीकडे असेल.   


इंडियन महाराजा संघाकडून कोण कोण खेळणार?
युवराज सिंगसह वीरेंद्र सेहवाग, हरभजन सिंग, इरफान पठाण, युसूफ पठाण, एस बद्रीनाथ, आरपी  सिंग, प्रग्यान ओझा, नमन ओझा, मनप्रीत गोनी, हेमांग बदानी, वेणुगोपाळ राव, मुनाफ पटेल, संजय बांगल, नयन मोंगिया आणि अमित भंडारी हेही या लीगमध्ये खेळणार आहेत. २० जानेवारीपासून ओमान येथील अल अमेरट क्रिकेट स्टेडियमवर  ही लीग खेळवण्यात येणार आहे. इंडियन महाराजा या संघासह आशिया आणि रेस्ट ऑफ दी वर्ल्ड असे दोन संघाचाही लीगमध्ये सहभाग असणार आहे. 

आशिया लायन्स संघाकडून शोएब अख्तर, शाहिद आफ्रिदी, सनथ जयसूर्या, मुथय्या मुरलीधरन, चामिंडा वास, रोमेश कालुवितरणा, तिलकरत्ने दिलशान, अझर महमुद, उपुल तरंगा, मिसबाह-उल-हक, मोहम्मद हाफिज, शोएब मलिक, मोहम्मद युसूफ, उमर गुल आणि अस्गर अफगान हे खेळताना दिसतील. 

Web Title: Legends League Cricket: Virender Sehwag to captain Indian Maharaja side; Misbah Ul Haq will lead Asia Lions team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.