Join us  

२० हजार धावा अन् १४०० हून अधिक विकेट्स घेणारा अष्टपैलू खेळाडू मृत्यूशी देतोय झुंज... 

देशांतर्गत क्रिकेटमध्ये ५०० हून अधिक धावा आणि ५० हून अधिक विकेट्स घेणारे ते एकमेव खेळाडू आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2024 4:58 PM

Open in App

दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक आणि महान अष्टपैलू खेळाडू माईक प्रॉक्टर ( Mike Procter ) सध्या गंभीर प्रकृतीशी झुंज देत आहेत. शस्त्रक्रियेच्या गुंतागुंतीनंतर प्रॉक्टर यांना हृदयविकाराचा त्रास झाला आणि ते आता ICU मध्ये आहेत. सोमवार दिनांक १२ फेब्रुवारीपासून त्यांची मृत्यूशी झुंज सुरू आहे.

  ७७ वर्षीय क्रिकेटपटूच्या कुटुंबाने एएफपीशीला सांगितले की, प्रॉक्टरला डर्बनजवळील रुग्णालयात शस्त्रक्रियेदरम्यान हृदयविकाराचा त्रास जाणवू लागला. ज्यामुळे त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. "गेल्या आठवड्यात माईकवर शस्त्रक्रियेदरम्यान एक गुंतागुंतीची परिस्थिती निर्माण झाली.  आयसीयूमध्ये बरे होत असताना त्यांना हृदयविकाराचा त्रास झाला. तो सध्या आयसीयूमध्ये त्याच्या रिकव्हरीवर काम करत आहे. तुम्ही त्याच्यासाठी प्रार्थना करा," असे प्रॉक्टरच्या कुटुंबीयांच्या निवेदनात म्हटले आहे. 

माईक प्रॉक्टरच्या १९६७ ते १०७० या कालावधीत त्यांनी सात कसोटी सामने खेळले आणि सहा सामन्यांमध्ये विजय मिळवला. त्यांनी १५.०२ च्या उत्कृष्ट सरासरीने ४१ विकेट्स घेतल्या. १९७०मध्ये वर्णद्वेषाच्या राजवटीमुळे दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेटवरील आंतरराष्ट्रीय बंदीमुळे त्याची आशादायक आंतरराष्ट्रीय कारकीर्द कमी झाली. पण, प्रॉक्टरने प्रथम श्रेणी आणि लिस्ट-ए क्रिकेट गाजवले.  

४०१ प्रथम-श्रेणी सामन्यांमध्ये प्रॉक्टरने ३६.०१ च्या सरासरीने २१,९३६ धावा केल्या.  ज्यात १९७१ मध्ये वेस्टर्न प्रोव्हिन्स विरुद्ध रोडेशिया (आता झिम्बाब्वे) या सामन्यातील संस्मरणीय २५४ धावांच्या खेळीचा समावेश आहे. त्यांनी कारकिर्दीत ४८ शतके आणि १०९ अर्धशतक झळकावली.  प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्यांनी १४१७ विकेट्स घेतल्या. दक्षिण आफ्रिकेच्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये ५०० हून अधिक धावा आणि ५० हून अधिक विकेट्स घेणारे ते एकमेव खेळाडू आहेत. १९९२च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत सहभागी झालेल्या आफ्रिका संघाचे ते प्रशिक्षक होते.  

टॅग्स :द. आफ्रिकाऑफ द फिल्ड