Join us

पृथ्वी शॉकडे भारतीय संघाचे नेतृत्व

न्यूझीलंड येथे १३ जानेवारी ते ३ फेब्रुवारीदरम्यान होणाºया १९ वर्षांखालील विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघाचे नेतृत्व मुंबईचा तडफदार फलंदाज पृथ्वी शॉकडे सोपविण्यात आले आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 01:41 IST

Open in App

नवी दिल्ली : न्यूझीलंड येथे १३ जानेवारी ते ३ फेब्रुवारीदरम्यान होणाºया १९ वर्षांखालील विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघाचे नेतृत्व मुंबईचा तडफदार फलंदाज पृथ्वी शॉकडे सोपविण्यात आले आहे.बीसीसीआयचे कार्यकारी सचिव अमिताभ चौधरी यांनी संघाची घोषणा केली. या स्पर्धेत १६ देशांचे संघ सहभागी होणार आहेत. भारतीय संघाचे प्रशिक्षण शिबिर बंगलुरू येथे ८ ते २२ डिसेंबरदरम्यान होणार आहे. गतवर्षी बांगलादेशमध्ये झालेल्या या स्पर्धेत भारतीय संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. त्यांना वेस्ट इंडिजकडून पराभव पत्करावा लागला होता. यापूर्वी भारतीय संघाने २०००, २००८ व २०१२, तर आॅस्ट्रेलियाने १९८८, २००२ व २०१० मध्ये विजेतेपद जिंकले होते. मुंबईचा पृथ्वी शॉ आणि बंगालचा पॉरेल यांना रणजी करंडक सामना खेळण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. हे दोघे १२ डिसेंबरपासून प्रशिक्षण शिबिरात दाखल होतील.संघ असापृथ्वी शॉ (कर्णधार), शुभम गिल (उपकर्णधार), मंजोत कालरा, हिमांशू राणा, अभिषेक शर्मा, ऋयान पराभ, आर्यण जुयाल (यष्टिरक्षक), शिवम मावी, कमलेश नागरकोटी, इशान पॉरेल, हार्विक देसाई (यष्टिरक्षक), अर्शदीप सिंग, अनुकुल रॉय, शिवा सिंग, पंकज यादव; राखीव : ओम भोसले, राहुल चहर, निनाद राथवा, ऊर्विल पटेल, आदित्य ठाकरे.

टॅग्स :क्रिकेटक्रीडा