Join us  

IPL 2021मधून मिळालेला संपूर्ण पगार कोरोना लढ्यासाठी केला दान; KKRच्या माजी खेळाडूचं मोठं काम

बीसीसीआयनं कोरोनच्या वाढत्या रुग्णांची संख्या लक्षात घेऊन आयपीएलचे १४वे पर्व स्थगित करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर खेळाडूंनीही मदतीचा हात पुढे केला.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2021 3:06 PM

Open in App

बीसीसीआयनं कोरोनच्या वाढत्या रुग्णांची संख्या लक्षात घेऊन आयपीएलचे १४वे पर्व स्थगित करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर खेळाडूंनीही मदतीचा हात पुढे केला. पॅट कमिन्स, ब्रेट ली, शिखर धवन, शेल्डन जॅक्सन, अजिंक्य रहाणे, सचिन तेंडुलकर यांनीही मदत केली. शुक्रवारी टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनही दोन कोटींची मदत जाहीर केली. भारताचा व बंगालचा माजी क्रिकेटपटू लक्ष्मीरतन शुक्ला ( Laxmiratan Shukla) यानं आयपीएल २०२१त समालोचक म्हणून मिळालेला संपूर्ण पगार पश्चिम बंगाल मुख्यमंत्री सहाय्यता निधीत दान करण्याचा निर्णय घेतला. ट्विट करून त्यानं ही माहिती दिली.

शुक्ला हा २०१६ ते २०२१ या कालावधीत ममता बॅनर्जी यांच्या सरकारमध्ये क्रीडा व युवा कल्याण मंत्री होता. त्यानं याचवर्षाच्या सुरुवातीला राजकारणातून सन्यास घेतला. तो कोलकाता नाईट रायडर्सकडूनही खेळला आहे. आयपीएलमध्ये त्यानं ४७ सामने खेळले आहेत. तो म्हणाला,''आयपीएल २०२१तून समालोचक म्हणून मिळालेला सर्व पगार मी राज्याच्या मदतीसाठी दान करत आहे. मी जो कोणी आहे, तो या लोकांमुळेच आहे.''  

विराट कोहली-अनुष्का शर्मा यांनी केली दोन कोटींची मदत!    आयपीएल स्थगित झाल्यानंतर घरी परतलेल्या विराट कोहलीनं ( Virat Kohli) व अनुष्का शर्मा ( Anushka Sharma) यांनी कोरोना लढ्यात सहभाग घेतला आहे. शुक्रवारी सोशल मीडियावर या दोघांनी एक व्हिडीओ पोस्ट करून याबाबतची माहिती दिली. Ketto यांच्यासोबत मिळून ही दोघं निधी गोळा करणार आहेत आणि त्यातील प्रत्येक रक्कम ही कोरोना लढ्यासाठी वापरली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. या दोघांनी नुसतं आवाहनच केलं नाही तर स्वतः दोन कोटींची मदतही केली. Virat Kohli and Anushka Sharma donated 2 crore for the COVID-19 crisis in India through Ketto

''देशातील आरोग्य यंत्रणा न थकता, न थांबता कोरोना व्हायरसशी मुकाबला करत आहेत. पण, आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं आपल्या आरोग्य यंत्रणेलाच आव्हान दिलं आहे. आता आपण सर्वांनी एकत्र येऊन भारताला मदत करण्याची गरज आहे.  अनुष्का आणि मी Kettoवर एक मोहीम सुरू केली आहे. त्यातून जमा होणार निधी हा कोरोना लढ्यासाठी वापरला जाणार आहे. तुमचा पाठिंबाही महत्त्वाचा आहे. आयुष्य वाचवण्यासाठी छोटीशी मदतही खूप मोठी असते.'' असे ही दोघं या व्हिडीओत म्हणत आहेत. 

टॅग्स :आयपीएल २०२१पश्चिम बंगाल