Join us
Daily Top 2Weekly Top 5

फिलीप ह्युजला अखेरचा निरोप

By admin | Updated: December 3, 2014 00:00 IST

Open in App

मला तुमच्याबद्दल माहीत नाही पण मी फिलला शोधत असतो. आत्ता त्याचा फोन येईल किंवा एखाद्या कोप-यात त्याचा चेहरा दिसेल मला वाटतं. तो सदैव माझ्यासोबत राहिल अशी मी आशा करतो अशा शब्दांत क्लार्कने त्याला श्रद्धांजली वाहिली.

फिलला अखेरचा निरोप देताना मॅक्सव्हिले येथील नागरिक.

सहका-याचे सांत्वन करताना ऑस्ट्रेलियन कर्णधार मायकल क्लार्क

यावेळी भारतातर्फे विराट कोहली उपस्थित होता.

ज्याचा बाऊंसर लागून फिलला दुखापत झाली व त्याचा मृत्यू ओढवला तो सीन अ‍ॅबॉटही यावेळी फिलला आदरांजली वाहण्यास उपस्थित होता.

आपल्या लाडक्या मित्राला अखेरचा निरोप देताना क्लार्कला अश्रू अनावर झाले होते.

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मायकेल क्लार्कने त्याचा जीवलग मित्र व लहान भावासारख्या असणा-या फिलच्या कॉफीनला खांदा दिला.

फिलच्या अंत्यसंस्कारप्रसंगी शोकाकुल झालेले त्याचे कुटुंबिय

फिलच्या कॉफीनला खांदा देत त्याच्या वडिलांनी साश्रूनयनांनी आपल्या लाडक्या मुलाला अखेरचा निरोप दिला.

एका स्थानिक सामन्यादरम्यान खेळताना बाऊंसर लागून डोक्याला दुखापत झाल्याने मृत्युमुखी पडलेला ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू फिलीप ह्युजला आज मॅक्सव्हिले या त्याच्या मूळगावी अखेरचा निरोप देण्यात आला. यावेळी त्याचे कुटुंबिय मित्र ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघातील सहकारी तसेच जगभरातील आजी-माजी दिग्गज खेळाडूंसह अनेक चाहते उपस्थित होते.