Join us  

विदेशी भूमीवर मालिका जिंकण्याची अखेरची संधी

आॅस्ट्रेलिया-भारत यांच्यात काही दिवसांनंतर चार सामन्यांची कसोटी मालिका खेळविण्यात येईल.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2018 4:36 AM

Open in App

- अयाझ मेमनआॅस्ट्रेलिया-भारत यांच्यात काही दिवसांनंतर चार सामन्यांची कसोटी मालिका खेळविण्यात येईल. ही मालिका मोठी आणि तितकीच महत्त्वाची असेल. कारण विदेशी भूमीवर या वर्षांत भारताचे प्रदर्शन चांगले राहिले नाही. दक्षिण आफ्रिकेकडून २-१ ने तर इंग्लंडकडून ४-१ ने पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे या वर्षांतील विदेशी भूमीवर शेवटची मालिका जिंकण्याची संधी भारतीय संघापुढे असेल.२०१८ या वर्षाला सुरुवात झाली तेव्हा कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी दावा केला होता की त्यांचा हा संघ आतापर्यंतचा सर्वात चांगला संघ आहे. परंतु, तसे झाले नाही. विदेशी भूमीवर हा संघ अपयशी ठरला. यापूर्वी, भारताने आॅस्ट्रेलियात कधीच मालिका जिंकलेली नाही. त्यामुळे विराट कोहलीला आॅस्ट्रेलियात मालिका जिंकून देण्याची संधी आहे. तसे झाल्यास त्याचे नाव यशस्वी कर्णधारांमध्ये सर्वांत वरच्या क्रमांकावर असेल. विराट हा सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्याच्यावर बरीच भिस्त अवलंबून आहे. तो जर आपल्या फॉर्ममध्ये नसेल तर भारताला मोठा झटका बसेल. कर्णधार म्हणूनही त्याला दोन-अडीच वर्षे झाली आहेत. त्यामुळे तो आता नवीन आहे, असे म्हणता येणार नाही. त्याच्याकडून फलंदाजी आणि कर्णधार म्हणून आशा असतीलच. परंतु, कर्णधार म्हणून इतर फलंदाजांकडून योगदान कसे वाढवता येईल, याचाही विचार विराटला करावा लागेल. दुसरीकडे, गोलंदाजीत भारताचे प्रदर्शन सर्वाेत्तम नव्हते. सराव सामन्यात क्रिकेट आॅस्ट्रेलिया संघाला बाद करण्यासाठी भारतीय गोलंदाजांना शंभरहून अधिक षटके फेकावी लागली. त्यावरून गोलंदाजांचा संघर्ष लक्षात येईल. दुसरीकडे, पृथ्वी शॉ हा सराव सामन्यात दुखापतग्रस्त झाला. हा झटकाही मोठा असू शकतो. कारण त्याने सराव सामन्यात ६६ धावा केल्या होत्या. के. एल. राहुलनेही अर्धशतक झळकाविले. त्यामुळे त्याला अजूनही सिद्ध करता आले नाही. पहिल्या कसोटी तुम्ही कशी कामगिरी करता त्यावरून तुमच्या संघाचे परीक्षण करता येईल. आफ्रिका आणि इंग्लंडमध्ये भारतीय संघाला सराव करण्याची संधी मिळाली नव्हती. येथे मात्र सराव सामने खेळता आले. त्याचा संघाला फायदा होईल. आॅस्ट्रेलियापुढे विराट कोहलीला रोखण्याचे आव्हान असेल. कारण विराटने या वर्षी दहा सामन्यांत एक हजार ६३ धावा केल्या आहेत. असा फॉर्म फार कमी फलंदाजांचा असतो. त्यामुळे विराटवर आॅस्ट्रेलियन गोलंदाजांची नजर असेल. त्यांनी विराटविरुद्ध काही रणनीती आखली आहे. ती रणनीती यशस्वी होईल का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. विराटसारखा खेळाडू जेव्हा चूक करतो तेव्हाच तो बाद होतो. त्यामुळे गोलंदाजांची परीक्षा असेल. आव्हानांचा सामना करतानाविराट कधीच डगमगत नाही. उलट तो त्यांचा आनंद घेतो. ‘स्लेजिंग’बाबत बोलायचे झाल्यास ही आॅस्ट्रेलियाची परंपरा राहिली आहे. डेविड वॉर्नर आणि स्टिव्ह स्मिथ जेव्हा स्लेजिंग करताना पकडले गेले तेव्हा त्यांच्यावर एका वर्षांचा बंदी ठोठावण्यात आली. त्यामुळे आॅस्ट्रेलियन क्रिकेटच्या प्रतिष्ठेला धक्का बसला. आता मात्र आॅस्ट्रेलिया संघ स्लेजिंगपासून दूर असेल. मात्र, ते प्रतिस्पर्धी संघाला नेहमी घाबरवण्याचा प्रयत्न करीत असतात. त्यासाठी ते स्लेजिंगचा आधार घेऊ शकतात. या वेळी विराट कोहली मात्र या सर्वांना घाबरणारा नाही. त्यामुळे तो विराटविरुद्ध असे करणार नाही. विराटने आपण स्लेजिंगबाबत सतर्क राहणार असल्याचे सांगितले आहे.(संपादकीय सल्लागार)

टॅग्स :अयाझ मेमन