Join us  

गेल्या 6 आयपीएल सामन्यांत कोहलीचा स्ट्राईक रेट शंभरच्या वर, पण...

सनरायझर्स हैदराबादविरुद्ध प्रथम फलंदाजीची संधी मिळाल्यानंतर आक्रमक सुरुवात केल्यानंतरही आरसीबीला २० षटकांत केवळ ६ बाद १६३ धावांचीच मजल मारता आली.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2020 2:41 PM

Open in App

- रोहित नाईक

मुंबई : गेल्या सत्रात अत्यंत निराशानजक कामगिरी झालेल्या रॉयल चॅलेंजर्स बँगलोरला (आरसीबी) गुणतालिकेत तळाच्या स्थानी समाधान मानावे लागले होते. यंदा मात्र त्यांनी धडाक्यात सुरुवात करताना तुल्यबळ अशा सनरायझर्स हैदराबादचा १० धावांनी पराभव करुन दिमाखात विजयी सलामी दिली. मात्र या सामन्यात कर्णधार आणि प्रमुख फलंदाज असलेल्या विराट कोहलीचे अपयश आरसीबीसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. त्याने सातत्याने गेल्या सहा आयपीएल सामन्यात १०० हून अधिक स्ट्राईक रेट राखली, मात्र यादरम्यान त्याची सर्वोत्तम खेळी राहीली केवळ २५ धावांची.

सनरायझर्स हैदराबादविरुद्ध प्रथम फलंदाजीची संधी मिळाल्यानंतर आक्रमक सुरुवात केल्यानंतरही आरसीबीला २० षटकांत केवळ ६ बाद १६३ धावांचीच मजल मारता आली. युवा सलामीवीर देवदत्त पडिक्कल (५६) आणि धडाकेबाज एबी डीव्हिलियर्स (५१) यांच्या आक्रमक अर्धशतकामुळे आरसीबीने बऱ्यापैकी धावसंख्या उभारली. या लक्ष्याचा पाठलाग करताना हैदराबादला जॉनी बेयरस्टॉ याने विजयी मर्गावर ठेवले होते. त्याने ४३ चेंडूत ६१ धावांची शानदार खेळी केली. मात्र युझवेंद्र चहलने एकाच षटकात त्याला आणि विजय शंकरला बाद करुन सामन्याचे चित्र पालटले आणि आरसीबीने अखेर १० धावांनी बाजी मारली.

आरसीबीने विजय मिळवला असला, तरी कर्णधार कोहलीचे अपयश मात्र चाहत्यांसाठी निराशाजनक ठरले. तब्बल सहा महिन्यांनी मैदानावर उतरलेल्या कोहलीकडून सर्वांनाच चौफेर फटकेबाजीची अपेक्षा होती. परंतु, तो १३चेंडूंत केवळ १४ धावा काढून बाद झाला.कोहली सलग सहाव्या आयपीएल सामन्यात अपयशी ठरला हे विशेष. कोहलीची आयपीएलमधील शेवटची सर्वोत्तम खेळी ठरली ती एप्रिल २०१९ मध्ये झालेल्या कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यातली. या सामन्यात त्याने सलामीला येत ५८ चेंडूंत १०० धावा काढल्या त्या १७२.४च्या जबरदस्त स्ट्राईक रेटने. मात्र यानंतर त्याला सातत्याने अपयश आले. 

सोमवारी झालेल्या हैदराबादविरुद्धच्या सामन्यातही त्याने १०७.७ ची स्ट्राईक रेट काढली, पण केवळ १४ धावांची खेळी केली.  या सामन्याआधीच्या पाच सामन्यांत कोहलीने अनुक्रमे २२८.६, ३५७.१, १३५.३, १६२.५ आणि ११२.५ अशी स्ट्राईक रेट राखली. पण कोणत्याही सामन्यात त्याला २५ हून अधिक धावांची खेळी करता आलेली नाही.

आयपीएलमधील कोहलीच्या मागील सहा सामन्यांतील कामगिरी :

१. २०२० : वि. सनरायझर्स हैदराबाद  - १३ चेंडूंत १४ धावा, स्ट्राईक रेट : १०७.७२. २०१९ : वि. सनरायझर्स हैदराबाद - ७ चेंडूंत १६ धावा, स्ट्राईक रेट : २२८.६३. २०१९ : वि. राजस्थान रॉयल्स - ७ चेंडूंत २५ धावा, स्ट्राईक रेट : ३५७.१.४. २०१९ : वि. दिल्ली कॅपिटल्स - १७ चेंडूंत २३ धावा, स्ट्राईक रेट : १३५.३.५. २०१९ : वि. किंग्ज ईलेव्हन पंजाब - ८ चेंडूंत १३ धावा, स्ट्राईक रेट : १६२.५.६. २०१९ : वि. चेन्नई सुपरकिंग्ज - ८ चेंडूंत ९ धावा, स्ट्राईक रेट : ११२.५.

टॅग्स :विराट कोहलीIPL 2020रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर