Lalit Modi: ललित मोदी रूग्णालयात दाखल; प्रकृतीबद्दल दिली मोठी अपडेट 

Lalit Modi health: देशात पुन्हा एकदा कोविड रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2023 06:15 PM2023-01-13T18:15:14+5:302023-01-13T18:16:05+5:30

whatsapp join usJoin us
Lalit Modi, ex-boyfriend of Sushmita Sen and ex-commissioner of IPL, has been found corona positive  | Lalit Modi: ललित मोदी रूग्णालयात दाखल; प्रकृतीबद्दल दिली मोठी अपडेट 

Lalit Modi: ललित मोदी रूग्णालयात दाखल; प्रकृतीबद्दल दिली मोठी अपडेट 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली : देशात पुन्हा एकदा कोविड रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. अनेक सेलिब्रिटी आणि प्रसिद्ध व्यक्ती देखील कोरोना संक्रमित आढळले आहेत. कोरोनाचा जन्म झाला त्या चीनमध्ये आताच्या घडीला कोरोनाचा विस्फोट सुरू आहे. अशातच आयपीएलचे माजी कमिशनर ललित मोदी यांची देखील कोरोना चाचणी पॉझीटिव्ह आली आहे. याबाबतची माहिती खुद्द मोदी यांनी 13 जानेवारी रोजी सोशल मीडियावर एक पोस्ट करून दिली. 

दरम्यान, त्यांनी रूग्णालयातील फोटो शेअर करून चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याचे म्हटले आहे. इतकेच नाही तर ललित मोदींनी त्यांची काळजी घेणाऱ्या डॉक्टरांचेही आभार मानले आहेत. त्यांच्यासोबतचे फोटो शेअर करत मोदींनी लिहिले, "माझ्या दोन तारणकर्त्यांसोबत. दोन डॉक्टरांनी 3 आठवडे गंभीरपणे माझ्यावर उपचार केले. मी 24/7 ज्यांच्या देखरेखीखाली होतो आणि दुसरे माझे लंडनचे डॉ. ज्यांनी विशेषत: मला लंडनला परतण्यासाठी मेक्सिको सिटीमध्ये उड्डाण केले. मला बाहेर काढण्यासाठी त्यांनी दिलेल्या वेळेचे वर्णन करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. यातून अजून सावरायला वेळ लागेल. सध्या 24/7 बाहेरील ऑक्सिजनवर आहे. मला वाटते की स्पर्श करावे आणि जावे. पण माझी मुले आणि माझा जवळचा मित्र हरीश साळवे जे माझ्या तीन आठवड्यांपैकी 2 आठवडे पूर्णपणे माझ्या पाठीशी होते. ते सर्व माझे कुटुंब आणि माझा भाग आहेत." 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

 

Web Title: Lalit Modi, ex-boyfriend of Sushmita Sen and ex-commissioner of IPL, has been found corona positive 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.