Join us  

अनिल कुंबळेमुळे कुलदीप यादव यशस्वी: सुरेश रैना

सध्या मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये कुलदीप यादव खूप लक्षवेधी ठरत असून, आपल्या फिरकीने तो भारतीय संघासाठी मोलाचे योगदान देत आहे. त्याच्या या यशामागे भारताचे माजी प्रशिक्षक अनिल कुंबळे यांचे फार मोठे योगदान असून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2017 2:54 AM

Open in App

मुंबई : सध्या मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये कुलदीप यादव खूप लक्षवेधी ठरत असून, आपल्या फिरकीने तो भारतीय संघासाठी मोलाचे योगदान देत आहे. त्याच्या या यशामागे भारताचे माजी प्रशिक्षक अनिल कुंबळे यांचे फार मोठे योगदान असून, कुलदीपच्या यशाचे श्रेय कुंबळे यांना जाते, असे भारताचा स्टार क्रिकेटपटू सुरेश रैना याने सांगितले.मुंबईत गुरुवारी गोवा रिव्हर मॅरेथॉनची घोषणा रैनाच्या उपस्थितीत करण्यात आली. या वेळी भारताची अनुभवी धावपटू कविता राऊतही उपस्थित होती. कुलदीपविषयी रैना म्हणाला की, ‘कुलदीप सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्याची कामगिरी उंचावण्यासाठी अनिल भार्इंनी खूप मेहनत घेतली आहे. आयपीएलमध्येही मी त्याचा खेळ जवळून पाहिला असून, अनेकवेळा चर्चा केली आहे. तसेच, ब्रॅड हॉगसारखा अनुभवी गोलंदाज संघात असूनही त्याने आपली स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. यामागे कुंबळे यांचीच मेहनत असून, त्यांनीच कुलदीपला घडविले आहे. कुलदीपमुळे गोलंदाजीमध्ये खूप विविधता आली.’सध्या भारतीय संघाबाहेर असलेल्या रैनाने आपल्या पुनरागमनाविषयी म्हटले की, ‘संघात परतण्यासाठी मी खूप मेहनत घेत असून, लवकरच माझे पुनरागमन होईल. तसेच, सध्या मी देशांतर्गत क्रिकेटच्या माध्यमातून खेळाचा आनंद घेत आहे. मला दुखापतींनी ग्रासले तेव्हा तो कठीण काळ होता, पण आता मी त्यातून स्वत:ला सावरले आहे.’ त्याचबरोबर रैनाने या वेळी बीसीसीआयने अनिवार्य केलेल्या ‘यो - यो’ चाचणीबाबत बोलणे टाळले.‘आॅस्टेÑलियाविरुद्धच्या मालिकेत भारतीय संघ चांगली कामगिरी करत असल्याचा आनंद आहे. महत्त्वाचे म्हणजे संघ विजयी होत आहे. जेव्हा मला संधी मिळेल, तेव्हा मीदेखील या संघाचा भाग असेल,’ असेही रैनाने या वेळी म्हटले.

टॅग्स :क्रिकेटभारतीय क्रिकेट संघ