‘कसोटीत कुलदीपला संधी मिळावी’

कुलदीप यादव याच्या गोलंदाजीवर इंग्लंडच्या फलंदाजांनी भलेही तोडगा काढला असेल. मात्र त्याला पाच दिवसीय कसोटी क्रिकेट सामन्यात संधी मिळावी, असे मत इंग्लंडचे माजी फिरकीपटू फिल टफनेल यांनी व्यक्त केले आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2018 06:51 IST2018-07-20T02:06:24+5:302018-07-20T06:51:28+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
'Kuldeep get chance in Test cricket' | ‘कसोटीत कुलदीपला संधी मिळावी’

‘कसोटीत कुलदीपला संधी मिळावी’

लंडन : कुलदीप यादव याच्या गोलंदाजीवर इंग्लंडच्या फलंदाजांनी भलेही तोडगा काढला असेल. मात्र त्याला पाच दिवसीय कसोटी क्रिकेट सामन्यात संधी मिळावी, असे मत इंग्लंडचे माजी फिरकीपटू फिल टफनेल यांनी व्यक्त केले आहे. टफनेल यांनी कुलदीपचे कौतुक केले ते म्हणाले की, ‘कुलदीप यादवजवळ अनोखे कौशल्य आहे. तुम्हाला डाव्या हाताने फिरकी गोलंदाजी करणारे खेळाडू जास्त मिळत नाही. सर्व प्रारूपांमध्ये काही मोजके खेळाडू आहेत.’

त्याचप्रमाणे ‘कुलदीप त्यातीलच एक अनोखा गोलंदाज आहे. जेव्हा तुम्ही असे गोलंदाज बघता तेव्हा त्यावर काम करण्याची गरज आहे. कारण आम्ही हे आधी पाहिलेले नाही,’ असेही टफनेल यांनी म्हटले. कुलदीपविषयि त्यांनी पुढे म्हटले की, ‘एक परिपूर्ण गोलंदाज म्हणून त्याच्यात एक विशेष क्षमता आहे. मी निश्चितपणे त्याच्या मैदानात पाहण्यास उत्सुक आहे. खेळपट्टी आणि परिस्थिती पाहता भारत तीन फिरकीपटूंसोबत खेळेल.’

Web Title: 'Kuldeep get chance in Test cricket'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.