चेन्नई : विराट कोहली शानदार खेळाडू असून तो कर्णधार म्हणून जबरदस्त आहे. आॅस्टेÑलियाच्या सर्वोत्कृष्ट कर्णधारांपैकी एक असलेल्या रिकी पाँटिंगप्रमाणेच त्याचे नेतृत्व आक्रमक आहे,’ असे आॅस्टेÑलियाचा माजी क्रिकेटपटू मायकल हसी याने म्हटले.
वृत्तसंस्थेशी बोलताना हसीने म्हटले की, ‘कोहली शानदार आहे. त्याच्या नेतृत्वाची पद्धत मला आवडते. त्याची आक्रमक प्रवृत्ती आणि जिंकण्याचा जोश यासाठी मी त्याचा चाहता आहे. संघाला जेवढे पुढे घेऊन जाता येईल, त्यासाठी तो पूर्ण प्रयत्न करतो. त्याने सामना आणि सराव यामध्ये नवा उच्चांक गाठला आहे. जिंकण्याचा निर्धार आणि स्पर्धेची भावना यामध्ये तो पाँटिंगसारखा आहे.’
पुढील महिन्यात आॅसी संघ भारत दौºयावर एकदिवसीय मालिका खेळण्यास येणार आहे. ही मालिका रंगतदार होईल, असे सांगताना हसी म्हणाला की, ‘आशा आहे की ही मालिका शानदार होईल. एकदिवसीय सामन्यात दोन्ही संघ चांगले खेळत आहेत. दोन्ही संघांमध्ये चांगले असून त्यांनी मागील काही वर्षांमध्ये एकदिवसीय मालिका जिंकल्या आहेत. भारतात जिंकायचे असेल तर, कोणा एका खेळाडूवर अवलंबून न राहता प्रत्येक खेळाडूला योगदान द्यावे लागेल.’ तसेच श्रीलंकेविरुद्धच्या विजयानंतर भारताचा आत्मविश्वास खूप उंचावला असेल. एकदिवसीय सामन्यांमध्ये भारतीय संघ मजबूत असून आॅस्टेÑलियाकडून त्यांना कडवी टक्कर मिळेल, असेही हसीने म्हटले. (वृत्तसंस्था)
>आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्जच्या पुनरागमनाने मी खूश असून उत्सुकता वाढली आहे. दोन वर्षांनी पुनरागमन करणे सीएसकेसाठी आव्हानात्मक ठरेल. मी सीएसकेकडून खेळलो असून संघातील खेळाडू आणि अधिकाºयांसह चांगली ओळख आहे. संधी मिळाली तर नक्कीच मी सीएसकेच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी पार पाडेन.
- मायकल हसी