Join us  

कोहलीचा राग, बाप रे बाप... सांगतोय रिषभ पंत

हा राग अजूनही पंत विसरू शकलेला नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2019 4:53 PM

Open in App

नवी दिल्ली : सध्याच्या घडीला आयपीएल ज्वर चढायला सुरुवात झाली आहे. पण अजूनही भारताचा यष्टीरक्षक रिषभ पंत हा एका गोष्टीतून बाहेर आलेला नाही. अजूनही तो घाबरलेला आहे. या गोष्टीला कारण ठरलाय कर्णधार विराट कोहलीचा राग. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एका एकदिवसीय सामन्यात कोहली पंतवर चांगलाच रागावला होता. पण हा राग अजूनही पंत विसरू शकलेला नाही. आयपीएलमधील दिल्ली कॅपिटल्स या संघाच्या ट्विटरवर पंतने ही गोष्ट शेअर केली आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अखेरच्या दोन एकदिवसीय सामन्यांमध्ये महेंद्रसिंग धोनीने विश्रांती घेतली होती. त्यामुळे पंतला संघात स्थान देण्यात आले होते. त्यावेळी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या सामन्यात एक गोष्ट अशी घडली की ज्यामुळे कोहली पंतवर चांगलाच वैतागलेला दिसला.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या सामन्यात पंत धोनीसारखी स्टम्पमागून बोलंदाजी करत होता. यावेळी पंत धोनीसारखीच स्टाईल मारताना दिसत होता. या सामन्यात धोनीसारखीच स्टम्पिंग करण्याचा पंतने प्रयत्न केला. पण या प्रयत्नामध्ये पंत फसला. फलंदाज यष्टीचीत झालाच नाही, पण भारताला एक धावही गमवावी लागली. त्यामुळे कोहली पंतवर चांगलाच भडकला होता.

याबाबत पंत म्हणाला की, " मी फक्त घाबरतो ते कोहलीच्या रागाला. कारण कोहली जेव्हा रागावतो तेव्हा आपण काहीच करू शकत नाही. पण कोहली कुणावरही कारणाशिवाय रागवत नाही. त्यावेळी माझ्याकडून चूक झाली होती, त्यामुळे कोहली माझ्यावर रागावला होता."

रिषभ पंत ठरतोय निवड समितीसाठी डोकेदुखीन्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या ट्वेन्टी-20 सामना पाहिला तर भारतीय संघामध्ये तीन यष्टीरक्षकांचा समावेश करण्यात आला होता. यामध्ये महेंद्रसिंग धोनी, दिनेश कार्तिक आणि रिषभ पंत यांचा समावेश होता. पण आता रिषभ पंत डोकेदुखी ठरू लागला आहे, असे मत दस्तुरखुद्द निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी सांगितले आहे.

प्रसाद हे निवड समितीचे अध्यक्ष असले तरी ते भारताकडून यष्टीरक्षक म्हणूनच खेळले होते. त्यामुळे एका संघात तीन यष्टीरक्षक असणे, ही बाब कदाचित त्यांना योग्य वाटत नसावी. आगामी विश्वचषकाचा विचार केल्यास एका संघात तीन यष्टीरक्षक असणे किती योग्य आहे, याचा विचारही प्रसाद करत असतील.

टॅग्स :विराट कोहलीरिषभ पंतआयपीएल