Join us  

माझ्या संघात आई-बहिणीवरुन शिव्या द्यायच्या नाहीत – महेंद्रसिंह धोनी

ही एक गोष्ट जरी कोहली धोनीकडून शिकला तरी त्याच्यामध्ये सकारात्मक बदल घडेल, असे चाहत्यांना वाटत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2018 2:43 PM

Open in App
ठळक मुद्देमाझ्या संघात आई-बहिणीवरुन शिव्या द्यायच्या नाहीत, असे धोनी नेहमी आम्हाला सांगायचा, असे त्याच्या मित्राने सांगितले आहे.

मुंबई : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली अजूनही परिपक्व झालेला नाही, असं काही जणं म्हणतात. या गोष्टीमध्ये काही सत्यताही आहे. कारण ज्यापद्धतीने भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी नेतृत्त्व करायचा, तसं अजून कोहलीला जमत नाही, असं म्हटलं जातंय. यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोहलीने धोनीकडून काही गोष्टी शिकायल्या हव्यात, असं क्रिकेट चाहत्यांना वाटत आहे.

' द धोनी टच ' या पुस्तकामध्ये माहीच्या काही मित्रांनी त्याच्याबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. धोनीला आपल्या संघाबद्दल, खेळाडूंबद्दल, प्रतिस्पर्ध्यांबद्दल नेमकं काय वाटायचं, हे त्याच्या मित्रांनी या पुस्तकामध्ये नमुद केलं आहे. त्याच बरोबर काही दाखलेही धोनीच्या मित्रांनी या पुस्तकामध्ये दिले आहेत.

यापुस्तकात धोनीच्या एका मित्राने सांगितले आहे की, " धोनी हा आक्रमक आहे. आपल्या कामगिरीतून तो आक्रमकता दाखवून देतो. धोनीने कधीही कुणाला शिवी दिलेली नाही. त्याचबरोबर आपल्या संघातील कुणीही शिवी देऊ नये, असे धोनीला वाटते. माझ्या संघात आई-बहिणीवरुन शिव्या द्यायच्या नाहीत, असे धोनीला कायम वाटते. " ही गोष्ट जरी कोहली धोनीकडून शिकला तरी त्याच्यामध्ये सकारात्मक बदल घडेल, असे चाहत्यांना वाटत आहे.

टॅग्स :महेंद्रसिंह धोनीविराट कोहली