Join us  

कोहली, शास्त्रीचे अधिकार कमी होणार?

पहिल्या दोन्ही कसोटीत झालेल्या पराभवानंतर बीसीसीआयकडून कर्णधार विराट कोहली व प्रशिक्षक रवी शास्त्री यांना धारेवर धरले जाईल, असे संकेत मिळाले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2018 4:32 AM

Open in App

मुंबई - पहिल्या दोन्ही कसोटीत झालेल्या पराभवानंतर बीसीसीआयकडून कर्णधार विराट कोहली व प्रशिक्षक रवी शास्त्री यांना धारेवर धरले जाईल, असे संकेत मिळाले आहेत.‘जे मागितले ते आम्ही दिले, अपेक्षित निकाल येत नसतील तर बोर्डाला प्रश्न विचारण्याचा हक्क असल्याचे, सूत्रांनी सांगितले.तिसरा कसोटी सामना १८ आॅगस्टपासून नॉटिंगहॅम येथे होईल. या सामन्याच्या निकालानंतरच चौथ्या व पाचव्या सामन्यासाठी संघ निवडला जाईल. त्याचवेळी बीसीसीआय संभाव्य कारवाईचा निर्णय घेईल. एका वरिष्ठ अधिकाऱ्यानुसार, इंग्लंड दौºयाच्या तयारीसाठी वेळ मिळाला नसल्याचे कारण संघ देऊ शकत नाही. द. आफ्रिकेविरुद्ध मालिकेनंतर खेळाडूंनी व्यस्त वेळापत्रक तसेच सराव सामन्यांच्या अभावाची तक्रार केली. त्यानुसारच मर्यादित षटकांची मालिका कसोटी मालिकेआधी खेळविण्याचा निर्णय घेतला होता.’वरिष्ठ संघाच्या विनंतीवरूनच आम्ही भारत अ संघाला एकाचवेळी दौºयावर पाठविले. खेळाडूंनी जे-जे मागितले, ते सर्व आम्ही दिले. त्यामुळे प्रश्न विचारण्याचा बोर्डाला हक्क आहे. भारत मालिका गमविणार असेल तर आम्ही कोहली व शास्त्री यांच अधिकारात कपातही करू शकतो,’ असेही अधिकाºयाने म्हटले.

टॅग्स :विराट कोहलीभारत विरुद्ध इंग्लंड