Join us  

कोहली आयसीसी ‘क्रिकेटर आॅफ द इयर’, सलग दुस-या वर्षी भारतीय खेळाडूला सन्मान

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आयसीसीचे वार्षिक पुरस्कार जाहीर झाले आहेत. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला ‘क्रिकेटर आॅफ द इयर’साठी सर गारफिल्ड सोबर्स पुरस्काराने गौरविण्यात येईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 2:47 AM

Open in App

दुबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आयसीसीचे वार्षिक पुरस्कार जाहीर झाले आहेत. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला ‘क्रिकेटर आॅफ द इयर’साठी सर गारफिल्ड सोबर्स पुरस्काराने गौरविण्यात येईल. सलग दुसºया वर्षी हा पुरस्कार भारतीय खेळाडूला मिळणार आहे.विराटला यंदा तिन्ही महत्त्वाचे सन्मान मिळाले आहेत. त्यात आयसीसी क्रिकेटर आॅफ द इयर, आयसीसी वन डे क्रिकेटर आॅफ द इयर या दोन पुरस्कारांसोबत आयसीसीच्या कसोटी तसेच वन डे संघाच्या कर्णधारपदाची माळ विराटच्याच गळ्यात पडली आहे. मागील वर्षी भारताचा अष्टपैलू खेळाडू रविचंद्रन आश्विनला सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून गौरविण्यात आले होते.

२१ सप्टेंबर २०१६ पासून डिसेंबर २०१७ पर्यंतच्या कामगिरीच्या आधारे २०१७ सालच्या या पुरस्कारांच्या विजेत्यांची घोषणा करण्यात आली. ‘क्रिकेटर आॅफ द इयर’ पुरस्कार म्हणून मिळणारी सर गारफिल्ड सोबर्स ट्रॉफी माझ्यासाठी विशेष असल्याचे मत विराटने हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर व्यक्त केले. हा माझा खूप मोठा सन्मान असल्याचे मी मानतो, असे सांगून सलग दुसºयांदा भारतीय खेळाडूंनी हा पुरस्कार जिंकल्याचा आनंद वाटतो, असे विराट म्हणाला. द. आफ्रिका दौºयात विराटच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांत पराभव पत्करावा लागल्यानंतर विराटवर सर्व स्तरांमधून टीका होत आहे. अशा वेळी पुरस्कार घोषित झाला. कोहलीच्याच नेतृत्वात भारत आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानावर विराजमान झाला. स्टीव्ह स्मिथ याची मोसमातील सर्वोत्कृष्ट कसोटीपटू म्हणून निवड करण्यात आली. त्याला दुसºयांदा हा पुरस्कार मिळाला.आयसीसी वार्षिक पुरस्कारांची यादीआयसीसी फॅन्स मुव्हमेंट आॅफ द इयर : पाकने भारताला नमवून २०१७ चा चॅम्पियन्स चषक जिंकला तो क्षण.आयसीसी पुरुष कसोटी संघ : विराट कोहली (कर्णधार, भारत), डीन एल्गर (द. आफ्रिका), डेविड वॉर्नर (आॅस्ट्रेलिया), स्टीव्ह स्मिथ (आॅस्ट्रेलिया), चेतेश्वर पुजारा (भारत), बेन स्टोक्स (इंग्लंड), क्विंटन डिकॉक (यष्टिरक्षक) (द. आफ्रिका), रविचंद्रन आश्विन (भारत), मिशेल स्टार्क (आॅस्ट्रेलिया), कागिसो रबाडा (द. आफ्रिका) व जेम्स अँडरसन (इंग्लंड).आयसीसी वन-डे संघ: विराट कोहली (कर्णधार,भारत), डेव्हिड वॉर्नर (आॅस्ट्रेलिया), रोहित शर्मा (भारत), बाबर आझम (पाकिस्तान), एबी डिव्हिलियर्स (द. आफ्रिका), क्विंटन डिकॉक (विकेट कीपर) (दक्षिण आफ्रिका), बेन स्टोक्स (इंग्लंड), ट्रेंट बोल्ट (न्यूझीलंड), हसन अली (पाकिस्तान), राशिद खान (अफगाणिस्तान), जसप्रीत बुमराह (भारत). 

टॅग्स :विराट कोहलीआयसीसी