Join us  

कोहली पाचव्या स्थानी, आयसीसी कसोटी रॅँकिंग; चेतेश्वर पुजारा चौथ्या क्रमांकावर

आयसीसीने जाहीर केलेल्या ताज्या कसोटी रँकिंगमध्ये भारतीय कर्णधार विराट कोहलीला एका स्थानाचा फायदा झाला असून तो आता पाचव्या क्रमांकावर आला आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 3:43 AM

Open in App

दुबई : आयसीसीने जाहीर केलेल्या ताज्या कसोटी रँकिंगमध्ये भारतीय कर्णधार विराट कोहलीला एका स्थानाचा फायदा झाला असून तो आता पाचव्या क्रमांकावर आला आहे. चेतेश्वर पुजारा चौथ्या क्रमांकावरच कायम राहिला आहे. गोलंदाजीत मात्र रवींद्र जडेजाला एक स्थान खाली तिसरे स्थान मिळाले आहे.विराट कोहलीने श्रीलंकेविरुद्ध पहिल्या कसोटीत दुसºया डावात नाबाद शतक झळकावले. विराटचे हे पन्नासावे आंतरराष्टÑीय शतक आहे. यामुळे तो डेव्हिड वॉर्नरला मागे टाकत पाचव्या स्थानी आला. भारताचा सलामीचा फलंदाज शिखर धवन यालाही रॅँकिंगमध्ये फायदा झाला असून तो आता २८ व्या स्थानी आला आहे. लोकेश राहुल आठव्या, तर अजिंक्य रहाणे १४ व्या क्रमांकावर आहेत. गोलंदाजीत भुवनेश्वरकुमारला आठ क्रमांकाचा फायदा झाला असून तो आता २९ व्या स्थानी पोहोचला आहे. मोहम्मद शमी १८ व्या स्थानी आहे. अष्टपैलू खेळाडूंमध्ये रवींद्र जडेजाला अग्रस्थानी येण्याची संधी होती. मात्र तो तिसºया क्रमांकावर गेला आहे. रविचंद्रन आश्विन चौथ्या स्थानी कायम आहे. संघांच्या रॅँकिंगमध्ये अजूनही भारत अग्रस्थानी असून द. आफ्रिका दुसºया क्रमांकावर आहे. जर आॅस्ट्रेलियाने अ‍ॅशेस मालिका २-० अशी जिंकली तर ते इंग्लंडला मागे टाकतील. जर त्यांनी ही मालिका ५-० अशी जिंकली, तर त्यांना तिसºया क्रमांकावर पोहोचण्याची संधी आहे.

टॅग्स :विराट कोहलीआयसीसी