अॅडिलेड : विराट कोहलीला आताही अडचणीत आणता येते, असे मत आॅस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगने व्यक्त केले. आॅस्ट्रेलिया संघाने गप्प बसून विराट कोहलीला वर्चस्व गाजवण्याची संधी देण्यापेक्षा त्याला कुठल्याही पद्धतीने त्रास द्यायला हवा, असेही पॉन्टिंगने म्हटले आहे.
भारत आणि आॅस्ट्रेलिया यांच्यादरम्यान चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिली लढत गुरुवारपासून सुरू होत आहे. आॅस्ट्रेलियाचा माजी फलंदाजी डीन जोन्सने कोहलीला न डिवचण्याचा सल्ला दिला आहे.
पॉन्टिंग पुढे म्हणाला, ‘‘आमचे स्वदेशातील क्रिकेट खेळणे चांगल्या शारीरिक हावभावासोबत जुळलेले आहे. आॅस्ट्रेलियन संघ याच देहबोलीने सर्वोत्तम कामगिरी करीत आलेला आहे.जर वर्तमान संघ आक्रमक मानसिकतेने खेळणार नसेल तर ते चुकीचे ठरेल.
‘पूर्वीचा आॅस्ट्रेलियन संघ काही टिपणी करीत होता, पण त्या वेळी त्यांंना आक्रमक गोलंदाजीची साथ लाभत होती. आपण त्याशिवाय हे करू शकत नाही. नाही तर सर्वकाही निरर्थक ठरते.’ (वृत्तसंस्था)
>आॅस्ट्रेलिया संघ मायदेशातील मैदानावर कोहलीला आपल्या जाळ्यात अडकवू शकतो का, असे विचारले असता पॉन्टिंग म्हणाला, ‘हो, ते शक्य आहे. त्याला त्रास देता येणार नाही, असा तो खेळाडू नाही. मी त्याला अडचणीत येताना बघितले आहे. मिशेल जॉन्सनने त्याला आपल्या भेदक माऱ्याने आणि त्याच्या आजूबाजूला आक्रमक हावभावाने त्रासविले होते. त्यामुळे गप्प बसून दुसºयाला वरचढ ठरण्याची संधी देण्यास माझा विरोध आहे.’