Join us

वर्तमान काळात कोहली सर्वोत्तम : इयान चॅपेल

नवी दिल्ली : शानदार फटके व फिटनेसच्या आधारावर भारतीय कर्णधार विराट कोहली सध्या तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये जगातील सर्वोत्तम फलंदाज ...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2020 04:57 IST

Open in App

नवी दिल्ली : शानदार फटके व फिटनेसच्या आधारावर भारतीय कर्णधार विराट कोहली सध्या तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये जगातील सर्वोत्तम फलंदाज आहे, असे मत आॅस्ट्रेलियाचे माजी कर्णधार इयान चॅपेल यांनी व्यक्त केले.‘द आर के शो’मध्ये बोलताना चॅपेल म्हणाले,‘स्टीव्ह स्मिथ, केन विलियम्सन व जो रूट यांच्यात कोहली तिन्ही प्रकाराच्या क्रिकेटमध्ये सर्वोत्तम आहे. यात कुठली शंकाच नाही. तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये त्याची कामगिरी उल्लेखनीय आहे. विशेषत: मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये.’ यापूर्वी इंग्लंडचा माजी फलंदाज केव्हिन पीटरसनने म्हटले होते की, आॅस्ट्रेलियन फलंदाज स्मिथ कोहलीच्या जवळपासही नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ७० शतकांसह २० हजारपेक्षा अधिक धावा फटकावणाऱ्या कोहलीची तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये सरासरी ५० पेक्षा अधिक आहे. कोहली सर्वोत्तम असल्याचे मानता का? याबाबत बोलताना चॅपेल म्हणाले, ‘मला त्याची फलंदाजीची शैली आवडते. भारतीय संघ यापूर्वी ज्यावेळी आॅस्ट्रेलिया दौºयावर आला होता त्यावेळी मी विराटची मुलाखत घेतली होती. त्यावेळी त्याने टी-२० क्रिकेटप्रमाणे आक्रमक का खेळत नसल्याचे सांगितले होते. तो म्हणाला होता, ‘कसोटी क्रिकेटमध्ये तशा प्रकारचे फटके माझ्या फलंदाजीमध्ये यावे असे मला वाटत नाही. आमच्या काळात मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये व्हिव्ह रिचडर्््सकडे शानदार फटके होते. तो आक्रमक खेळत होता. कोहलीसुद्धा तसाच आहे. तो पारंपरिक क्रिकेट शॉट चांगल्याप्रकारे खेळतो. तसेच त्याच्या फिटनेसची तुलनाच करता येणार नाही. त्याचा फिटनेस व रनिंग बिटविन विकेट शानदार आहे. त्याच्या काही खेळी शानदार आहेत. त्याची नेतृत्वशैलीही चांगली आहे. त्याला पराभवाचे भय नाही. तो विजय मिळविण्याच्या प्रयत्नात पराभवासाठीही सज्ज असतो.’

टॅग्स :विराट कोहली