Join us  

कॉफी विथ करण प्रकरण : हार्दिक पांड्या बीसीसीआयच्या लोकपालासमोर हजर

कॉफी विथ करण 6 कार्यक्रमातील महिलांबद्दल विवादास्पद वक्तव्यानंतर हार्दिक पांड्या आणि लोकेश राहुल यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2019 11:51 AM

Open in App

मुंबई, आयपीएल 2019 : कॉफी विथ करण 6 कार्यक्रमातील महिलांबद्दल विवादास्पद वक्तव्यानंतर हार्दिक पांड्या आणि लोकेश राहुल यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली. या प्रकरणाची चौकशी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने नियुक्त केलेले लोकपाल करत आहेत आणि मंगळवारी पांड्यानं लोकपाल डी के जैना यांच्यासमोर हजेरी लावताना आपली बाजू मांडली. राहुल बुधवारी जैन यांच्याकडे आपली बाजू मांडणार आहे.

इंडियन प्रीमिअर लीगमधील मुंबई इंडियन्सचा हा खेळाडू सततच्या सामन्यामुळे व्यग्र आहे, तर राहुल हा किंग्स इलेव्हन पंजाबचा सदस्य आहे. कॉफी विथ करण प्रकरणानंतर पांड्या व राहुल यांच्यावर निलंबनाची कारवाई केली होती. त्यामुळे या दोघांना ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून माघारी बोलावण्यात आले होते. पण, कालांतराने त्यांच्यावरील बंदी उठवण्यात आली आणि त्यांनी राष्ट्रीय संघात कमबॅक केले. या प्रकरणाची पुढील चौकशी लोकपाल करत आहेत.

पांड्या आणि राहुल यांची बाजू ऐकल्यानंतर लोकपालांना या प्रकरणाचा अहवाल सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या प्रशासकिय समितीसमोर मांडायचा आहे. हा अहवाल वर्ल्ड कप संघ जाहीर होण्यापूर्वी मांडावा लागणार आहे. ''अहवाल सादर करण्यासाठी वेळेचे बंधन नाही, परंतु वर्ल्ड कप संघ जाहीर होण्यापूर्वी तो सादर झाल्यास बरे होईल. या दोघांना केलेल्या गुन्ह्यापेक्षा अधिक शिक्षा मिळणार नाही. लोकपाल काय अहवाल देतात, त्यावर सर्व अवलंबून आहे,'' असे बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. 

कॉफी विथ करण 6 कार्यक्रमात पांड्या असं नक्की बोलला तरी काय? करण जोहर : नाईट क्लबमध्ये तु मुलींना त्यांची नावं का नाही विचारत?हार्दिक पांड्याः मला प्रत्येकीची नावं लक्षात राहत नाही. क्लबमध्ये मुली कशा चालतात हे मला पाहणे आणि निरिक्षण करायला आवडते. त्या कशा चालतात हे पाहण्यासाठी मी त्यांच्या मागेच उभा राहतो. मी जेव्हा पहिल्यांदा सेक्स केले. तेव्हा मी घरी येऊन म्हणालो की, मै करके आया आज ( आज मी करून आलो).''कुटुंबीयही  किती कूल आहेत हे पांड्या सांगू लागला. तो म्हणाला,''एका पार्टीमध्ये आई-वडिलांनी मला विचारले, अच्छा तेरा वाला कौन सा है ( यातील तुझी गर्लफ्रेंड कोण?). त्यावेळी मी ही, ही, ही ( अनेक मुलींकडे बोट दाखवत) असे म्हणालो आणि त्यावर त्यांनी माझा अभिमान वाटतो अशी प्रतिक्रिया दिली. ''करण जोहर : तुम्ही दोघं एकाच मुलीच्या मागे लागलात, तर त्याचा निर्णय कसा घ्याल?लोकेश राहुल : हा निर्णय त्या मुलीवर सोडूहार्दिक पांड्या : असं काही नसत, सर्व काही टॅलेंटवर अवलंबून आहे. ज्याला मिळेल त्यानं घेऊन जावं.

टॅग्स :हार्दिक पांड्याकॉफी विथ करण 6लोकेश राहुलबीसीसीआय