Join us
Daily Top 2Weekly Top 5

लोकेश राहुल- अथिया शेट्टी यांच्या प्रेमाच्या पुन्हा रंगल्या चर्चा; क्रिकेटपटूनं पोस्टमध्ये तिला म्हटलं 'Mad Child'!

बॉलिवूड अभिनेता आणि निर्माता शेट्टीची मुलगी अभिनेत्री अथिया शेट्टी आज तिचा वाढदिवस साजरा करीत आहे. अथियाने न्यूयॉर्क फिल्म अ‍ॅकॅडमीमधून तिने फिल्म मेकिंग आणि लिबरल आर्टमध्ये पदवी प्राप्त केली.

By स्वदेश घाणेकर | Updated: November 5, 2020 18:50 IST

Open in App

बॉलिवूड अभिनेता आणि निर्माता शेट्टीची मुलगी अभिनेत्री अथिया शेट्टी आज तिचा वाढदिवस साजरा करीत आहे. अथियाने न्यूयॉर्क फिल्म अ‍ॅकॅडमीमधून तिने फिल्म मेकिंग आणि लिबरल आर्टमध्ये पदवी प्राप्त केली.  अभिनयाव्यतिरिक्त अथिया शेट्टीला नृत्य करण्याची खूप आवड आहे. तिने नृत्यदिग्दर्शक रेमो डिसूझा कडून प्रशिक्षण घेतले आहे. 2015मध्ये निखिल आडवाणीच्या 'हीरो' सिनेमातून तिने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. 'नवाबजादे' आणि 'मोतीचूर चकनाचूर' सिनेमात अथिया झळकली आहे. आथियाचे नाव भारताचा क्रिकेटपटू लोकेश राहुल ( KL Rahul) याच्याशी नेहमी जोडले गेले. या दोघांना अनेकदा एकत्रही पाहिले गेले आहे. आज अथियाच्या वाढदिवसानिमित्त लोकेश राहुलनं केलेल्या पोस्टची चर्चा सुरु झाली. 

किंग्स इलेव्हन पंजाबचा ( KXIP) कर्णधार आणि टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज लोकेश राहुल आणि बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी यांच्या प्रेमाच्या चर्चा अनेकदा रंगल्या.त्यामुळे गुगुलवर या दोघांबाबत जाणून घेण्यासाठी नेटिझन्सनं सर्च इंजिनचं डोकं खांजवलं. राहुल आणि अथिया हे चांगले मित्र आहेत. एकमेकांच्या सोशल अकाऊंटवर दोघंही लाईक्स कमेंट्स करत असतात आणि त्यामुळे त्यांच्या प्रेमसंबंधांच्या चर्चाही रंगल्या आहेत. त्यामुळेच गुगलनं अथिया शेट्टीच्या प्रोफाईलवर लोकेश राहुलची पत्नी असे नमूद केले होते. त्यात आता लोकेशच्या नव्या पोस्टनं पुन्हा यांच्या प्रेमाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.  

टॅग्स :लोकेश राहुलअथिया शेट्टी