Join us  

केएल राहुलचा मुंबईत 4BHK सी-फेसिंग आलिशान फ्लॅट; महिन्याचं भाडं माहितीये का?

या फ्लॅटचं इंटिरीयर डिझाइन राहुलच्या सासुबाईंनीच केलंय

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2023 9:35 AM

Open in App

KL Rahul Mumbai House Rent : भारताचा धडाकेबाज फलंदाज आणि यष्टीरक्षक केएल राहुल सध्या आशिया चषकात आपली चमक दाखवत आहे. नुकतेच राहुलने पाकिस्तान विरूद्ध शतक ठोकले होते. या शतकाची भरपूर चर्चा झाली. तब्बल सहा महिन्यांनी राहुल मैदानात उतरला आणि त्याने कट्टर प्रतिस्पर्ध्यांना धूळ चारली. राहुलचे लग्न झाल्यापासून तो क्रिकेटपासून दूर होता. तो सध्या त्याची पत्नी अथिया शेट्टीसोबत मुंबईत एका आलिशान 4-BHK सी-फेसिंग अपार्टमेंटमध्ये राहतो. गेल्या वर्षी लग्नाआधी तो इथे शिफ्ट झाला होता. त्या घराचं भाडं किती असेल अंदाज लावा.

किती आहे सी-फेसिंग?

केएल राहुल हा मूळचा बंगळुरूचा आहे. तेथे त्याचे स्वत:चे आलिशान घर आहे. बंगळुरूतील त्याच्या घराची किंमत सुमारे ६५ लाख रुपये आहे असे बोलले जाते. राहुल त्याच्या इंस्टाग्रामवर त्याच्या घरांचे फोटो बरेचदा पोस्ट करत असतो. मात्र भारतीय संघात निवड झाल्यानंतर आणि आथिया शेट्टीसोबत रिलेशनशीपमध्ये आल्यानंतर राहुलने मुंबईतही फ्लॅट घेतला आहे. हा फ्लॅट भाड्याने घेतला असून त्याचे भाडेही लाखात आहे. कार्टर रोडवर केएल राहुल आणि अथिया शेट्टी राहत असलेला फ्लॅट हा सी-फेसिंग आहे. 4BHK असा विस्तीर्ण असलेल्या फ्लॅटचे भाडे दरमहा 10 लाख रुपये इतके आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या जोडप्याने इमारतीचा संपूर्ण 8वा मजला भाड्याने घेतला आहे. याचे इंटीरियर डेकोरेशन केएल राहुलच्या सासूबाई माना शेट्टी यांनीच केल्याचेही सांगितले जाते.

सासरेबुवांकडून शतकवीर जावयाचं कौतुक!

राहुलने नुकतेच पाकिस्तान विरूद्ध शतक झळकावले. या शतकानंतर, राहुलचे सासरेबुवा म्हणजे बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टी 'लोकमत मोस्ट स्टायलीश' पुरस्कारांसाठी उपस्थित होता. त्यावेळी, राहुलच्या शतकावर तुमची प्रतिक्रिया काय? असे विचारल्यावर सुनील शेट्टीने काहीही न बोलता, बोटं दुमडून Fingers Crossed अशी अँक्शन केली. जे चाललंय ते छान चाललंय, बोलून उगाच त्याच्यावरचं दडपण वाढवू नका, अशा आशयची प्रतिक्रियाही त्याने दिली.

टॅग्स :लोकेश राहुलअथिया शेट्टी सुनील शेट्टीमुंबई