Join us  

KL Rahul Loves Athiya Shetty: केएल राहुल, अथिया शेट्टीच्या प्रेमाला सुनील शेट्टीची मिळाली परवानगी; फोटो व्हायरल

KL Rahul Loves Athiya Shetty: खुल्लम खुल्ला प्यार करेंगे हम दोनों! अखेर केएल राहुलने केला अथियाच्या प्रेमाचा स्वीकार; फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2021 10:36 AM

Open in App

क्रिकेटर आणि सिनेसृष्टी हे नाते बऱ्याच काळापासून आहे. आता हा वारसा भारताचा सलामीवीर के एल राहुल (KL Rahul) पुढे नेत आहे. बॉलिवूडचा प्रसिद्ध हिरो सुनिल शेट्टीची (Sunil Shetty) मुलगी आणि अभिनेत्री अथिया शेट्टीच्या (Athiya Shetty) प्रेमात राहुल पागल झाला आहे.  बऱ्याच दिवसांपासून त्यांच्यातील अफेअरची चर्चा गरम होती. काल अथियाच्या वाढदिवशी राहुलने यावर खुलासा केला आहे. केएल राहुलने सोशल मीडियावर अथियासोबतचे फोटो शेअर केले आहेत, जे जबरदस्त व्हायरल होत आहेत. 

केएल राहुलने अथियासोबत दोन फोटो शेअर केले आहेत. ते एका हॉटेलमध्ये बसलेले दिसत आहेत. राहुलने हार्ट इमोजीद्वारे अथियाला बर्थडे विश केले आहे. महत्वाचे म्हणजे या पोस्टला दस्तुरखुद्द सुनील शेट्टी आणि अहान शेट्टी यांनी लाईक केल्याने 'मिया बीबी राजी तो...' असे म्हणत एकप्रकारे संमती दिली आहे. दुसरीकडे त्या पोस्टवर टायगर श्रॉफ आणि कृष्णा श्रॉफ यांनी देखील कमेंट केली आहे.  अथिया आणि केएल राहुल यांच्यातील रिलेशनशिपची चर्चा लंडनमध्ये इंटरनॅशनल क्रिकेट सीरीजवेळी बीसीसीआयच्या डॉक्युमेंटमध्ये अथियाला आपला पार्टनर म्हटले होते. तेव्हा पासून व्हायला लागली होती. त्या आधी त्यांच्यात काहीतरी आहे अशी चर्चा रंगली होती. अनेकदा त्या दोघांचे फोटोही व्हायरल होत असायचे. परंतू दोघांनीही यावर खुलेपणाने काहीच वक्तव्य केले नव्हते. आज अखेर के एल राहुले अथियावरील प्रेम कबुल केले आहे. 

टीम इंडियानं ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत शुक्रवारी सर्व आघाड्यांवर बाजी मारली. गोलंदाजांच्या उल्लेखनीय कामगिरीला फलंदाजांनीही साजेशा साथ देताना कर्णधार विराट कोहलीला ( Virat Kohli) वाढदिवसाचं गिफ्ट दिलं. या सामन्यात लोकेश राहुलनं ( KL Rahul) ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वात जलद अर्धशतक झळकावणाऱ्या दुसऱ्या फलंदाजाचा मान पटकावला. त्याची ही वादळी खेळी पाहण्यासाठी अभिनेत्री व भारतीय फलंदाजाची कथित गर्लफ्रेंड अथिया शेट्टी ( Atiya Shetty) हीपण VIP बॉक्समध्ये दिसली.

राहुलनं अर्धशतकानंतर तिच्या दिशेनं बॅट उंचावली आणि तिनंही टाळ्या वाजवत दाद दिली. त्यामुळे हे गिफ्ट विराटसाठी की अथियासाठी असा प्रश्न नेटिझन्स विचारत आहेत. 

टॅग्स :लोकेश राहुलअथिया शेट्टी सुनील शेट्टीट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२१
Open in App