Join us

KKR vs RR Latest News : नितीश राणाचे यंदा तीन गोल्डन डक

कोलकाता नाईट रायडरचा फलंदाज नितीश राणा याच्यासाठी हे सत्र संमिश्र ठरले आहे

By स्वदेश घाणेकर | Updated: November 1, 2020 20:53 IST

Open in App

कोलकाता नाईट रायडरचा फलंदाज नितीश राणा याच्यासाठी हे सत्र संमिश्र ठरले आहे. त्याने या सत्रात तीन शानदार अर्धशतकांसह ३५२ धावा केल्या आहे. असे असले तरी याच सत्रात तीन वेळा तो पहिल्याच चेंडूवर बाद झाला आहे. अखेरच्या महत्त्वाच्या सामन्यात देखील तो आर्चरच्या पहिल्याच चेंडूवर बाद झाला. या आधी देखील दोन सामन्यात त्याने गोल्डन डक मिळवला आहे.  बहुदा एकाच सत्रात तीन वेळा गोल्डन डक घेणारा तो एकमेव फलंदाज ठरला.

नितीश राणा या सत्रात कोलकाताचा महत्त्वाचा खेळाडू ठरला. त्याने दोन वेळा ८० पेक्षा जास्त धावा केल्या. त्याने तीन अर्धशतकांपैकी दोन सामन्यात केकेआरला पराभव पत्करावा लागला. त्याने दिल्ली कॅपीटल्स विरोधात ८१ धावा फटकावल्या होत्या.  त्या सामन्यात केकेआरने विजय मिळवला. मात्र त्या आधी तो दिल्ली विरोधात अर्धशतक झळकावून देखील कोलकाताला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरला होता. त्याची दोन अर्धशतके दिल्ली विरोधात तर एक चेन्नई सुपरकिंग्ज विरोधात आहे.

मात्र त्यासोबतच आरसीबी, किंग्ज इलेव्हन पंजाब आणि राजस्थान रॉयल्स विरोधातील सामन्यात तो शुन्यावर बाद झाला. आरसीबीच्या सिराजने शानदार चेंडू फेकत त्याला त्रिफळाचीत केले होते. तर पंजाबच्या मॅक्सवेलने घेतलेल्या मोजक्या तीन बळींपैकी त्याचा एक होता. तर साखळी फेरीतील केकेआरच्या अखेरच्या सामन्यात जोफ्रा आर्चरने त्याला यष्टीरक्षक संजु सॅमसनकरवी झेलबाद केले.    

टॅग्स :IPL 2020कोलकाता नाईट रायडर्सराजस्थान रॉयल्स