Join us  

KKR vs RR, IPL 2018 Eliminator : राजस्थानवर विजयासह कोलकाता 'क्वालिफायर-2' मध्ये दाखल

एखादा सामना जिंकता जिंकता पराभूत व्हावा, याचा उत्तम वस्तुपाठ राजस्थान रॉयल्सच्या संघाने एलिमिनेटरच्या सामन्यात दाखवला.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2018 7:07 PM

Open in App
ठळक मुद्देया विजयासह कोलकात्याने 'क्वालिफायर-2' मध्ये स्थान पटकावले असून त्यांना आता शुक्रवारी सनरायझर्स हैदराबादचा सामना करावा लागणार आहे.

राजस्थानवर विजयासह कोलकाता 'क्वालिफायर-2' मध्ये दाखल

कोलकाता : एखादा सामना जिंकता जिंकता पराभूत व्हावा, याचा उत्तम वस्तुपाठ राजस्थान रॉयल्सच्या संघाने एलिमिनेटरच्या सामन्यात दाखवला. कोलकाता नाईट रायडर्सच्या 170 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानने 10 षटकांत 1 बाद 87 अशी मजल मारली होती, त्यावेळी त्यांना विजयासाठी उर्वरीत दहा षटकांत 83 धावांची गरज होती. त्यावेळी राजस्थानचा संघ सहज सामना जिंकेल, असे वाटत होते. पण त्यानंतर अजिंक्य रहाणे आणि संजू सॅमसन हाराकिरी केली. अजिंक्यने 46 तर सॅमसनने 50 धावा केल्या. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 62 धावांची भागीदारीही रचली, पण त्यासाठी 54 चेंडू त्यांनी खर्ची घातले. स्थिरस्थावर झाल्यावर हे दोघे संघाला सामना जिंकवून देतील, असे वाटत होते. पण या दोघांनी ऐन मोक्याच्या क्षणी कच खाल्ली आणि या दोघांनी संघाच्या पायावर पराभवाचा धोंडा मारला. या विजयासह कोलकात्याने 'क्वालिफायर-2' मध्ये स्थान पटकावले असून त्यांना आता शुक्रवारी सनरायझर्स हैदराबादचा सामना करावा लागणार आहे.

10.33 PM : कोलकात्याचा राजस्थानवर 25 धावांनी विजय

10.25 PM : स्टुअर्ट बिन्नी शून्यावर बाद; राजस्थानला चौथा धक्का

 

10.18 PM : संजू सॅमसन OUT; राजस्थानला तिसरा धक्का

 

10.17 PM : संजू सॅमसनचे 37 चेंडूंत अर्धशतक

10.06 PM :  अजिंक्य रहाणे OUT; राजस्थानला दुसरा धक्का

 

पीयुष चावलाने राहुल त्रिपाठीचा पकडलेला अफलातून झेल पाहा

 

9.44 PM :  राजस्थान 10 षटकांत 1 बाद 87

9.32 PM : राजस्थानला विजयासाठी 72 चेंडूंत 106 धावांची गरज

9.22 PM :  राजस्थानला पहिला धक्का; राहुल तिवारी बाद

 

9.15 PM : राहुल त्रिपाठीचे सलग दोन षटकार

9.00 PM : अजिंक्य रहाणेची षटकारासह दमदार सुरुवात

 

कार्तिक, रसेल यांची दमदार फलंदाजी; कोलकात्याच्या 169 धावा

कोलकाता : एलिमिनेटरच्या सामन्यात कर्णधार दिनेश कार्तिक आणि आंद्रे रसेल यांच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सला प्रथम फलंदाजी करताना 169 धावा करता आल्या. सामन्याच्या सुरुवातीला राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांनी भेदक मारा करत कोलकात्याची 3 बाद 24 अशी दयनीय अवस्था केली होती. पण त्यानंतर दिनेश कार्तिकने संघाचा धावफलक हलता ठेवण्याची जबाबदारी यशस्वीरीत्या पेलली. कार्तिकने 38 चेंडूंत चार चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर 52 धावा केल्या. कार्तिक बाद झाल्यावर रसेलने धडाकेबाज फलंदाजी केल्यामुळे कोलकात्याला राजस्थानपुढे 170 धावांचे आव्हान ठेवता आले. रसेलने 25 चेंडूंत तीन चौकार आणि पाच षटकारांच्या जोरावर नाबाद 49 धावांची खेळी साकारली.

8.40 PM : कोलकात्याचे राजस्थानपुढे 170 धावांचे आव्हान

 

8.27 PM : दिनेश कार्तिक OUT; कोलकात्याला मोठा धक्का

 

8.20 PM : षटकारासह दिनेश कार्तिकचे अर्धशतक पूर्ण

 

8.10 PM : कोलकात्याला पाचवा धक्का; शुभमन गिल बाद

 

7.53 PM : कोलकाता 10 षटकांत 4 बाद 63

7.42 PM : कोलकात्याला चौथा धक्का; ख्रिस लिन बाद

 

7.39 PM : आठव्या षटकात कोलकात्याचे अर्धशतक पूर्ण

7.30 PM : कोलकाता 5 षटकांत बिनबाद 32

9.23 PM : नीतीश राणा OUT; कोलकात्याला तिसरा धक्का

 

7.15 PM : रॉबिन उथप्पा OUT; कोलकात्याला दुसरा धक्का

 

7.03 PM : चौकारानंतर दुसऱ्याच चेंडूवर सुनील नरिन बाद

 

राजस्थानने नाणेफेक जिंकून कोलकात्याला फलंदाजीसाठी पाचारण केले

कोलकाता आणि राजस्थान यांना अखेरची संधी

कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यासाठी एलिमिनेटरचा हा सामना म्हणजे अखेरची संधी असेल. कारण हा सामना गमावल्यावर त्यांचे आव्हान संपुष्टात येणार आहे. त्यामुळे दोन्ही संघ या सामन्यात जीवाचे रान करतील. दोन्ही संघांचा विचार केला तर राजस्थानपेक्षा कोलकात्याचे पारडे जड आहे. त्याचबरोबर आपल्या घरच्या प्रेक्षकांसमोर खेळण्याची संधी कोलकात्याला मिळणार आहे.

दोन्ही संघ

 

टॅग्स :आयपीएल 2018कोलकाता नाईट रायडर्सराजस्थान रॉयल्स