केकेआरला हैदराबादविरुद्ध विजयाची गरज

कोलकाता नाईट रायडर्सला आयपीएल-११ च्या प्ले आॅफचा मार्ग सोपा करायचा झाल्यास आज शनिवारी सनरायझर्स हैदराबादवर विजय नोंदवावाच लागेल.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 00:13 IST2018-05-19T00:13:04+5:302018-05-19T00:13:04+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
KKR need to win against Hyderabad | केकेआरला हैदराबादविरुद्ध विजयाची गरज

केकेआरला हैदराबादविरुद्ध विजयाची गरज

हैदराबाद : कोलकाता नाईट रायडर्सला आयपीएल-११ च्या प्ले आॅफचा मार्ग सोपा करायचा झाल्यास आज शनिवारी सनरायझर्स हैदराबादवर विजय नोंदवावाच लागेल. सनरायझर्सचे १३ सामन्यात नऊ विजयासह १८ गुण असून काल आरसीबीकडून झालेल्या पराभवानंतरही या संघाचा आत्मविश्वास कायम आहे. केकेआरविरुद्ध थोडीशी शिथिलता त्यांना महागडी ठरू शकते.
दोन वेळेचा चॅम्पियन केकेआर १३ सामन्यात सात विजयासह तिसऱ्या स्थानी आहे. आज विजय मिळाल्यास प्ले आॅफमध्ये स्थान निश्चित होईल.
सनरायझर्सची जमेची बाजू त्यांची गोलंदाजी आहे. पण आरसीबीविरुद्ध गोलंदाजीच ढेपाळली. प्ले आॅफआधी चुकांवर तोडगा शोधण्याचा संघाचा प्रयत्न असेल. सनरायझर्स बासिल थम्पीला बाहेर बसवू शकतो. भुवनेश्वर कुमार सामन्यात पुनरागमन करणार असून त्याला सिद्धार्थ कौल, राशिद खान आणि शाकिब अल हसन यांची साथ लाभणार आहे.
केकेआरने मागच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सला धूळ चारल्याने त्यांचेही मनोबळ वाढले. त्या सामन्यात कुलदीप यादवने चार गडी बाद केले.
ख्रिस लीन, सुनील नारायण आणि कर्णधार दिनेश कार्तिक यांची कामगिरी संघाच्या यशसाठी निर्णायक ठरू शकेल. (वृत्तसंस्था)

Web Title: KKR need to win against Hyderabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.