Join us  

आयपीएलपूर्वी केकेआरला बसू शकतात दोन मोठे धक्के; नेमकं झालंय तरी काय...

... तर केकेआरमधील दोन खेळाडूंवर बंदी घालण्याचा निर्णय येऊ शकतो.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2019 7:06 PM

Open in App
ठळक मुद्देया दोन्ही खेळाडूंनी यापूर्वी केकेआरकडून प्रतिनिधीत्व केले आहे.

मुंबई : आयपीएल सुरु होण्यापूर्वीच कोलकाता नाइट रायजर्सला धक्के बसणं सुरु झालं आहे. यापूर्वी केकेआरच्या संघातील एका खेळाडूवर बंदी घातल्याचे वृत्त आले होते.  आता तर केकेआरमधील दोन खेळाडूंवर बंदी घालण्याचा निर्णय येऊ शकतो, असे म्हटले जात आहे. या दोन्ही खेळाडूंनी यापूर्वी केकेआरकडून प्रतिनिधीत्व केले आहे.

कोलकाताच्या संघाने या खेळाडूला आपल्या संघात स्थान दिले होते. या खेळाडूकडून केकेआरला मोठ्या अपेक्षा होत्या. या हंगामात केकेआरच्या संघात महत्वाचे बदल पाहायला मिळणार आहेत. या बदलांमध्ये या खेळाडू महत्वाची भूमिका पाहायला मिळाली असती. पण आता दोन वर्षे तरी या खेळाडूला क्रिकेट खेळता येणार नाही.

केकेआरसाठी नितीष राणाने यापूर्वी भरीव कामगिरी केली आहे. आपल्या धडाकेबाज फलंदाजीने केकेआरला धावा करून दिल्या आहेत, त्याचबरोबर गोलंदाजीमध्येही आपली चमक दाखवली आहे. केकेआरचा वेगवान गोलंदाज शिवम मावी याच्यावरही बंदी येण्याची शक्यता आहे. पण या दोघांनी नेमके केले तरी काय, हा प्रश्न तुम्हाला पडला असेल...

राणा आणि मावी यांच्यावर दोन वर्षांची बंदी येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण या दोघांनी आपले वय लपवले होते. या दोघांच्या विरोधात वयचोरीची तक्रार दाखल करण्यात आली आहे. यामध्ये जर ते दोषी आढळले तर त्यांच्यावर दोन वर्षांची बंदी घालण्यात येऊ शकते.

भारताच्या एका खेळाडूवर दोन वर्षांती बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे आयपीएलपूर्वीच कोलकाता नाइट रायडर्स संघाला मोठा धक्का बसला आहे.

कोलकाताच्या संघाने या खेळाडूला आपल्या संघात स्थान दिले होते. या खेळाडूकडून केकेआरला मोठ्या अपेक्षा होत्या. या हंगामात केकेआरच्या संघात महत्वाचे बदल पाहायला मिळणार आहेत. या बदलांमध्ये या खेळाडू महत्वाची भूमिका पाहायला मिळाली असती. पण आता दोन वर्षे तरी या खेळाडूला क्रिकेट खेळता येणार नाही.

भारताने २०१८ साली १९- वर्षांखालील विश्वचषक जिंकला होता. या विश्वचषकात या खेळाडूने महत्वाची भूमिका बजावली होती. या विश्वचषकाच्या अंतिम फेरीत या खेळाडूने शतक झळकावले होते. अंतिम फेरीत या खेळाडूला सामनावीराचा पुरस्कारही देण्यात आला होता. या खेळाडूवर वयचोरीचा आरोप ठेवण्यात आला होता. हा आरोप आता सिद्ध झाल्यामुळे त्याच्यावर दोन वर्षांची बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दिल्ली क्रिकेट संघटनेची काल वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. यावेळी संघटनेतील लोकपाल यांनी या खेळाडूवर दोन वर्षांची बंदी घालण्याचा निर्णय घेतला. आता हा खेळाडू कोण, याची उत्सुकता तुम्हाला असेल. हा केकेआरचा खेळाडू आहे मनोज कालरा. आता वयचोरीचा आरोप सिद्ध झाल्यामुळे मनोजला दोन वर्षे खेळता येणार नाही.

टॅग्स :कोलकाता नाईट रायडर्सआयपीएल