Join us  

केकेआर, दिल्ली पॉवर प्लेमध्ये फेल; IPL 2020 सत्रातील सर्वात कमी धावा

IPL 2020 कोलकाताकडून शुभमन गिल हा सलामी फलंदाजीला येतो.  याआधी काही सामन्यात त्याच्या सोबतीने सुनिल नरेन हा विंडिज्चा अष्टपैलु खेळाडू सलामीला येत होता.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2020 2:37 PM

Open in App

कोलकाता नाईट रायडर्सने शनिवारी झालेल्या सामन्यात यंदाच्या सत्रात पॉवर प्लेमध्ये दुसऱ्या क्रमांकाची सर्वात कमी धावसंख्या नोंदवली. किंग्ज इलेव्हन पंजाब विरोधात केकेआरला पॉवरप्लेमध्ये फक्त २ बाद २५ धावा करता आल्या.

या आधी दिल्लीने पंजाब विरोधातच ३ बाद २३ धावा अशी निचांकी कामगिरी केली होती. पहिल्या पॉवरप्ले मध्ये सर्वात कमी धावसंख्या नोंदवण्यामध्ये केकेआरच आघाडीवर आहेत. केकेआरने चार पैकी दोन वेळा अशी कामगिरी केली आहे. मुंबई इंडियन्स विरोधातही त्यांनी पॉवरप्लेमध्ये फक्त २ बाद ३३ धावा केल्या होत्या. पहिला पॉवरप्ले हा सहा षटकांचा असतो. त्यामुळे या सहा षटकातच संघाला मोठ्या धावसंख्येची पाया भरणी करण्याची संधी असते.

कोलकाताकडून शुभमन गिल हा सलामी फलंदाजीला येतो.  याआधी काही सामन्यात त्याच्या सोबतीने सुनिल नरेन हा विंडिज्चा अष्टपैलु खेळाडू सलामीला येत होता. मात्र त्याच्या सततच्या अपयशानंतर सलामीसाठी पंजाबविरोधातील सामन्यात राहुल त्रिपाठीला पाठवण्यात आले होते. राहुलने दोन सामन्यात सलामीला आला होता. त्यात पंजाबविरोधात त्याला फक्त चार धावा करता आल्या. मात्र त्या आधी चेन्नई विरोधात सलामीला येत त्याने ८१ धावा कुटल्या होत्या.

यंदा संघ व्यवस्थपनाचा सलामीचे फलंदाज निवडण्यात झालेल्या चुकीमुळे संघाला पहिल्या काही षटकांतील कमी धावांचा फटका बसत आहे. 

पीपी मधील सर्वात कमी धावसंख्या २३/३  दिल्ली वि.किंग्ज इलेव्हन पंजाब२५/२ केकेआर वि. पंजाब३१/३ आर.आर. वि. मुंबई३३/२ केकेआर वि. मुंबई

टॅग्स :कोलकाता नाईट रायडर्सIPL 2020