Join us  

सामन्यातील आघाडी महत्त्वाची

भारत - ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या कसोटीतील लढाई बरोबरीत सुरू आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 08, 2018 4:11 AM

Open in App

- अयाझ मेमनभारत - ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या कसोटीतील लढाई बरोबरीत सुरू आहे. पहिल्या दिवशी यजमानांनी वर्चस्व मिळविल्यानंतर दुसऱ्या दिवशी भारताने शानदार पुनरागमन केले. नाणेफेक जिंकून भारताने प्रथम फलंदाजी केली, पण त्यांना अपेक्षित धावसंख्या उभारता आली नाही. चेतेश्वर पुजारा जर खेळला नसता, तर कदाचित भारताचा डाव कमी धावांमध्ये संपुष्टात आला असता. त्यानंतर मात्र भारतीय गोलंदाजांनी कमाल केली. त्यांनी यजमानांचे सात बळी घेत भारताला पुनरागमन करून दिले. परंतु, अजूनही यजमानांचे तीन फलंदाज शिल्लक असून ट्राविस हेड चांगली फलंदाजी करीत आहे. त्याने पुजाराप्रमाणेच आपल्या संघाला सावरले आहे. त्यामुळे आता पहिल्या डावात कोणता संघ आघाडी घेणार याची उत्सुकता सर्वाधिक आहे.भारत आघाडी घेण्यास नक्कीच जोरदार प्रयत्न करेल, पण जरी आॅस्टेÑलियाने आघाडी घेतली, तर ती मोठी नसेल याची काळजी मात्र भारतीय नक्कीच घेतील. कारण अशा अटीतटीच्या सामन्यांमध्ये आघाडी मिळवणे मानसिकरीत्या खूप महत्त्वाचे ठरते. हा सामना कमी धावसंख्येचा दिसत असल्याने पहिल्या डावातील आघाडी महत्त्वाची ठरेल. शिवाय तिसºया दिवसातील पहिले सत्र निर्णायक ठरेल, असे दिसते. जर पूर्ण सत्र खेळून आॅस्टेÑलियाने आघाडी घेतली आणि आपले बळीही टिकवले, तर मात्र भारतीय नक्कीच दबावाखाली येतील. त्याचवेळी, भारताने पहिल्याच सत्रात झटपट तीन बळी घेतले, तर पाहुण्यांकडे सामना जिंकण्याची एक चांगली संधी असेल.यंदाच्या भारतीय संघाच्या कामगिरीवर नजर टाकल्यास गोलंदाजांचे योगदान शानदार ठरल्याचे दिसून येईल. पण कोहली किंवा पुजाराचा अपवाद वगळला तर इतर फलंदाज संघर्ष करताना दिसले. पहिल्या दिवशी नाणेफेक जिंकून भारताकडे ३५०च्या आसपास मजल मारण्याची संधी होती, पण ती संधी गमावल्याने माझ्या मते भारतीय फलंदाजांवर टीका झाली पाहिजे. मात्र गोलंदाजांनी आपल्या कामगिरीत कमालीचे सातत्य राखले आहे. जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, रविचंद्रन अश्विन आणि मोहम्मद शमी यांनी नियंत्रित मारा केला. या सामन्यात भारताकडे चार गोलंदाज आहेत आणि त्यांच्यावर कमी धावा देताना बळी मिळविण्याची जबाबदारी आहे. अश्विनने स्वत:ला सिद्ध केले आहे. आॅस्टेÑलियामध्ये त्याची कामगिरी विशेष नाही. त्याउलट इतर भारतीय फिरकीपटूंनी चांगले यश मिळवले आहे. त्यामुळे त्याच्यावर टीका होत होती. पण अश्विनने या सामन्यातून आपली छाप पाडली. आॅसी फलंदाजी कमजोर वाटत असली, तरी घरच्या मैदानावर त्यांना बाद करणे सोपे नाही. त्यामुळे त्याला त्याच्या कामगिरीचे श्रेय द्यावेच लागेल.आता सामना जिंकण्यासाठी भारताला सर्वप्रथम आॅस्टेÑलियाचा डाव लवकरात लवकर गुंडाळावा लागेल. त्यांची फलंदाजी कमजोर असली, तरी गोलंदाजी मात्र मजबूत आहे. त्यामुळे भारताला सांभाळून खेळावे लागेल. यजमान संघ शेवटाला फलंदाजी करणार असून या वेळी खेळपट्टी खराब झाली, तर त्याचा फायदा अश्विनला होईल. त्यामुळे यजमानांसाठी हे महागडे ठरेल. त्यामुळे भारताने २७०-३०० धावांपर्यंतची आघाडी मिळविली, तर संघाचा आत्मविश्वास नक्कीच वाढेल.संपादकीय सल्लागार

टॅग्स :अयाझ मेमन