Join us

त्यानं 29 चेंडूत ठोकलं झंझावाती शतक

विराट कोहली, ख्रिस गेल, डीव्हिलर्स यांची झंझावाती शतकी खेळी तुम्ही अनेकदा पाहिली असेल. त्यांनी षटकारांची केलेली आतिषबाजी पाहुन तुम्ही मंत्रमुग्ध झाला असाल.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 23:48 IST

Open in App

बंगळुरु, दि. 2 - विराट कोहली, ख्रिस गेल, डीव्हिलर्स यांची झंझावाती शतकी खेळी तुम्ही अनेकदा पाहिली असेल. त्यांनी षटकारांची केलेली आतिषबाजी पाहुन तुम्ही मंत्रमुग्ध झाला असाल. अशीच शेतकी खेळी करण्याचा पराक्रम आंध्र प्रदेशच्या एका फलंदाजाने तुफानी फटकेबाजी करत केला आहे. पाल प्रोलू रवींद्र असे त्या फलंदाजाचे नाव आहे. कर्नाटक स्टेट क्रिकेट असोसिएशन टुर्नामेंटमध्ये पाल प्रोलू रवींद्रने अवघ्या 29 चेंडूत शतक झळकावलं आहे. वीरेंद्र सेहवाग हा रवींद्रचा आदर्श खेळाडू आहे. आता त्याला आयपीएलची दारं खुणावत आहेत.रवींद्रने सिटी जिमखाना क्लबकडून खेळताना, झंझावाती फलंदाजी करत नवा रेकॉर्ड केला. त्याने अवघ्या 29 चेंडूत शतक ठोकलं. भारतीय क्रिकेट इतिहासात हे सर्वात वेगवान शतक ठरलं. रवींद्रने शतक ठोकण्यासाठी 29 चेंडू खेळले असले, तरी पुढच्या 44 धावा करण्यासाठीही त्याला 29 चेंडू खेळावे लागले. रवींद्रने 58 चेंडूत 144 धावा केल्या. या खेळीत त्याने 13 षटकार आणि 7 चौकार ठोकले. रवींद्रच्या या धडाकेबाज खेळीच्या जोरावर सिटी जिमखानाने 9 बाद 403 धावांचा डोंगर रचला. या आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या जयदूर क्लबचा डाव 229 धावांत गुंडाळला.27 वर्षाचा रवींद्र आंध्र प्रदेशातील गुंटूर जिल्ह्यातील एका शेतकरी कुटुंबातील आहे. त्याचा भाऊ वासू हा भारतीय सैन्यदलात आहे. 5 वर्षापूर्वी रवींद्र क्रिकेटमध्ये करिअर करण्यासाठी बंगळुरुला आला.