Join us  

IPL 2022 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या नशिबासमोर Karn Sharma चे Luck ही कामी नाही आले; प्रथमच 'जादू' झाली फेल! 

karn sharma luck never worked with RCB : जोस बटलरच्या ( Jos Buttler) नाबाद १०६ धावांच्या खेळीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने ( RR) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( RCB) वर ७ विकेट्स राखून विजय मिळवला.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2022 5:46 PM

Open in App

karn sharma luck never worked with RCB : जोस बटलरच्या ( Jos Buttler) नाबाद १०६ धावांच्या खेळीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने ( RR) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( RCB) वर ७ विकेट्स राखून विजय मिळवला. रजत पाटीदारच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर RCB ने १५७ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानने 'रॉयल' विजय मिळवला.  बटलरने हंगामातील चौथे शतक ठोकले आणि राजस्थानला तब्बल १४ वर्षांनी IPL च्या फायनलमध्ये पोहोचवले. RCB ने प्ले ऑफमध्ये प्रवेश केल्यानंतर ते यंदा जेतेपद जिंकतील अशी अपेक्षा होती. त्यात रजत पाटीदारने एलिमिनेटरमध्ये केलेली खेळी पाहून त्या आशा अधिक पल्लवीत झाल्या. कर्ण शर्मा ( Karn Sharma) हा इतरांप्रमाणे RCBसाठीही लकी ठरेल असा दावा केला गेला. पण, RCBच्या नशिबासमोर त्याचे लक कामी आले नाही.  

यंदाच्या मोसमात RCBकडून खेळणाऱ्या कर्ण शर्माच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागलं होतं. लिलावात त्याच्यासाठी ५० लाख रुपयांची बोली लागली. कर्ण शर्माची बेस प्राईजदेखील तितकीच होती. आयपीएलमध्ये खेळाडू म्हणून कर्ण शर्माची कामगिरी फारशी उत्तम नाही. मात्र तो चारवेळा विजेत्या संघाचा भाग राहिला आहे.  २०१६ मध्ये सनरायझर्स हैदराबादनं आयपीएल जेतेपदावर नाव कोरलं. त्यावेळी कर्ण शर्मा त्याच संघात होता. २०१७ मध्ये मुंबई इंडियन्सनं जेतेपद पटकावलं. त्यावेळी कर्ण मुंबईच्या संघाचा भाग होता. २०१८ ते २०२१ या कालावधीत कर्ण चेन्नई सुपर किंग्सचा घटक होता. २०१८ आणि २०२१ मध्ये चेन्नईच्या संघानं जेतेपद मिळवलं. 

आता कर्ण शर्मा अशा संघाचा भाग होता की ज्यांना एकदाही जेतेपद जिंकता आलेलं नव्हतं. कर्णमुळे RCBचं नशीब पालटणार का, याकडे अनेकांचं लक्ष लागलं होतं. पण, RCB स्वकर्माने स्पर्धेबाहेर फेकले गेले. मुंबई इंडियन्सच्या कृपेने त्यांनी बाद फेरीतील स्थान पक्के केले. त्यानंतर तरी विराट कोहली चांगली फटकेबाजी करेल अशी अपेक्षा होती, पण त्याने सर्वांना निराश केले. त्याने १६ सामन्यांत २३च्या सरासरीने ३४१ धावा केल्या. क्वालिफायर २ मध्ये त्याचे अपयश हेच संघाचे मनोबल ढासळवणारे ठरले. 

टॅग्स :आयपीएल २०२२रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरराजस्थान रॉयल्स
Open in App