Join us  

पाकिस्तानविरोधात विजयासाठी हे कराच...

यांच्यापासून धोका

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2019 6:49 AM

Open in App

अयाझ मेमन

भारतीय संघ व्यवस्थापनासाठी अंतिम ११ खेळाडूंची निवड हे सर्वात मोठे आव्हान असेल. धवनची दुखापत हा भारतासाठी धक्का आहे. मात्र, राहुल हा त्याचा पर्याय म्हणून योग्य आहे आणि तो फॉर्ममध्ये देखील आहे. चौथ्या क्रमांकाचा प्रश्न आता पुन्हा उभा राहिला आहे. भारताने या सामन्यात दोन तज्ज्ञ फिरकीपटूंसह खेळले पाहिजे. जर सामन्यात पावसाचा व्यत्यय आला आणि षटके कमी झाली तर जलदगती गोलंदाज मदत करू शकतात. ३५ षटकांचाच सामना जर झाला तर कुलदीपच खेळू शकतो. शिखर धवनला पर्याय म्हणून संघात दिनेश कार्तिकला स्थान मिळण्याची शक्यता आहे. धोनी किंवा हार्दिक चौथ्या क्रमांकावर खेळू शकतात. वातावरणामुळे हा सामना दोन्ही संघातील जलदगती गोलंदाजांचाच होण्याची शक्यता आहे. पाककडे आमिर आणि रियाज हे अनुभवी गोलंदाज आहेत. त्यामुळे बुमराह, भुवनेश्वर यांना आणि त्यांना मदत करणाऱ्या जलदगती गोलंदाजांना आपला खेळ उंचवावा लागेल.यांच्यापासून धोकाफखर जमान : एकदा दुहेरी शतकही झळकावले आहे. त्याला जोखीम घ्यायला आवडते.बाबर आझम : सर्वोत्कृष्ट फलंदाज. गरजेनुसार मोठी खेळी करू शकतो.सर्फराज अहमद : यष्टिरक्षक आणि फलंदाज या दोन्ही भूमिकांत तो उत्तम आहे. धावांचा पाठलाग करताना तो एक धोकादायक फलंदाज आहे.वहाब रियाज : अनुभवी गोलंदाज, लयीत असताना प्रतिस्पर्धी फलंदाजांसाठी धोकादायक ठरतो.मोहम्मद आमीर : सर्वात जास्त कौशल्य असलेला गोलंदाज, तो जुना व नवा दोन्ही चेंडू हाताळू शकतो.

(लेखक लोकमत वृत्तसमुहात संपादकीय सल्लागार आहेत )

टॅग्स :भारत विरुद्ध पाकिस्तानवर्ल्ड कप 2019