Join us  

केन विलियम्सनमध्ये दिसते कॅलिसची झलक

आतापर्यंत पाकिस्तानची निवड योग्य ठरलेली नाही. कुठलीच रणनीती त्यांच्यासाठी लाभदायक ठरलेली नाही. ते स्पर्धेत आपली उपस्थिती नोंदवण्यापूर्वीच बाहेर होतील असे वाटते.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2019 3:58 AM

Open in App

- ग्रॅमी स्मिथआतापर्यंत पाकिस्तानची निवड योग्य ठरलेली नाही. कुठलीच रणनीती त्यांच्यासाठी लाभदायक ठरलेली नाही. ते स्पर्धेत आपली उपस्थिती नोंदवण्यापूर्वीच बाहेर होतील असे वाटते. इंग्लंड व बांगलादेशची उर्वरित सामन्यांतील कामगिरी पाकसाठी नवी आशा जागवण्याचे काम करू शकते. त्यामुळे पाकला विश्वचषक स्पर्धेतील उपस्थिती दर्शविण्याची व जगाला आपली क्षमता दाखविण्याची संधी मिळू शकते.द. आफ्रिकेविरुद्ध पाक संघात ती आक्रमकता दिसली जी त्यांच्या संघातून लुप्त पावली होती. पाकला या लढतीत हॅरिस सोहेलला खेळवत मोठा धोका पत्करला होता, पण त्यामुळे त्यांना लाभ झाला. त्यांच्याकडे शादाब खान हा शानदार गोलंदाज आहे. पुढील लढतींमध्ये पाकने त्याला कायम ठेवायला हवे.न्यूझीलंडबाबत चर्चा करताना आपण केन विलियम्सनला एक महान खेळाडू म्हणून बघितले आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये नेहमीच चर्चा असते की तो न्यूझीलंडचा सर्वश्रेष्ठ खेळाडू आहे किंवा नाही. त्याला बघून मला जॅक कॅलिसची आठवण होते. विलियम्सन नेहमी आपल्या कार्यावर लक्ष केंद्रित करतो. त्याचे केवळ आपली भूमिका चोख बजावण्यावर लक्ष असते, पण त्याचा असा प्रभाव पडतो की लोक महानतेबाबत चर्चा करतात आणि त्याचे नाव पुढे येते. असे घडणे स्वाभाविक आहे कारण त्याने या स्पर्धेत दोन शतके झळकावली असून त्याची सरासरी १८६ ची आहे.न्यूझीलंडला कुठल्या विभागामध्ये सुधारणा करण्याची गरज आहे, हे समजणे कठीण आहे. ते सध्याच्या घडीला अव्वल आहेत, पण खेळपट्टी कोरडी असेल आणि फलंदाजीसाठी अनुकूल असेल त्यावेळी माझ्या मते ईश सोढीला संघात स्थान देण्याचा त्यांना मार्ग शोधावा लागेल. कॉलिन डीग्रँडहोमने चांगली कामगिरी केली.

टॅग्स :न्यूझीलंडवर्ल्ड कप 2019