कलिना  विभाग अ - घाटकोपर विभाग ब  यांच्यात जेतेपदाचा सामना 

२९ व्या कल्पेश गोविंद कोळी स्मृती चषकाच्या उपांत्य फेरीत कलिना विभाग अ आणि घाटकोपर विभाग ब संघांनी विजय मिळवला.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2019 06:44 PM2019-05-22T18:44:40+5:302019-05-22T18:44:55+5:30

whatsapp join usJoin us
Kalina Division A - Ghatkopar Division B into final of Kalpesh koli cricket tournament | कलिना  विभाग अ - घाटकोपर विभाग ब  यांच्यात जेतेपदाचा सामना 

कलिना  विभाग अ - घाटकोपर विभाग ब  यांच्यात जेतेपदाचा सामना 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई : २९ व्या कल्पेश गोविंद कोळी स्मृती चषकाच्या उपांत्य फेरीत कलिना विभाग अ आणि घाटकोपर विभाग ब संघांनी विजय मिळवला. घाटकोपर विभाग अ संघाच्या अमन खानच्या  (४/४७) फिरकी गोलंदाजीने ठाणे विभाग ब संघाला पहिल्या डावर १४ धावांनी पराभूत केले. दुसऱ्या सामन्यात बलाढ्य कालिना विभाग अ संघाला १३९ धावात गुंडाळले आणि कालिना विभाग ब फलंदाजी करताना ३४५ धावांचा डोगंर रचला आणि सहज पहील्या डावावर विजय मिळवत अंतिम फेरीत दाखल झाले. अंतिम फेरीचे सामने २४ व २५ मे रोजी न्यू हिंद स्पोर्टिग क्लब माटूंगा येथे रंगणार आहे. त्याचे थेट प्रक्षेपण यु ट्युब आणि फेसबुक वर दाखवण्यात येईल.       

कलिना विभाग (अ):- १३९/१० ( राजसिंग देशमुख ३४,झेनिथ सचदेव ४/४३,उमर खान ४/२०) आणि १९९/९ (राजसिंग देशमुख ६४, क्रिश सुभ्रमण्यम ३९, उमर खान २/४८, झेनिथ सचदेव २/५१, आयुष्य जेथव २/१९, अंक्रीश रघुवंशी २/६) पहिल्या डावावर पराभूत विरुद्ध  cकलिना विभाग (ब):- ३४५/१० ( जश गानिगा ६०,अंक्रीश रघुवंशी, ६०, शाश्वत झुनझुनवाला ४४, मनन भट ३२, तेजस चाळके ३/५८, शुभम खरात २/४४, रोनित ठाकूर २/८८) 
सामनावीर :उमर खान 

घाटकोपर विभाग (अ) :- १८१/१० ( पूजन राऊत ४३, अभिनव सिंग ८१, जय धात्रक ५/३७) आणि १६३/९ डाव घोषित (अभिनव सिंग ५०, आर्यन दलाल ३/६६, आकाश सिंग ३/३९) पहिल्या डावावर विजयी विरुद्ध 
ठाणे विभाग (ब) :- १६७/१० (आकाश सिंग ९८, हर्ष मेंडोन २/२९, अमन खान ४/४७, सिद्धांत वालावलकर २/३६)  
सामनावीर : अभिनव सिंग 
 

Web Title: Kalina Division A - Ghatkopar Division B into final of Kalpesh koli cricket tournament

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई