Join us  

जस्टिन लँगर आॅस्ट्रेलियाच्या प्रशिक्षकपदी

आॅस्ट्रेलियाचा माजी कसोटीपटू आणि समीचा फलंदाज जस्टिन लँगर याला क्रिकेट आॅस्ट्रेलियाने तिन्ही प्रकाराच्या क्रिकेट संघासाठी मुख्य प्रशिक्षक बनविले आहे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 04, 2018 12:30 AM

Open in App

सिडनी : आॅस्ट्रेलियाचा माजी कसोटीपटू आणि समीचा फलंदाज जस्टिन लँगर याला क्रिकेट आॅस्ट्रेलियाने तिन्ही प्रकाराच्या क्रिकेट संघासाठी मुख्य प्रशिक्षक बनविले आहे. लँगरने वादात अडकलेल्या खेळाडूंचे वर्तन सुधारणे आणि संघाने गमविलेली पत पुन्हा मिळवून देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. लँगर २३ मे रोजी पदाची सूत्रे स्वीकारेल आणि चार वर्षांसाठी ही नियुक्ती राहील. या दरम्यान अ‍ॅशेस मालिका, एक विश्वचषक आणि टी-२० विश्वचषकाचे आयोजन असेल. चेंडू कुरतडल्याप्रकरणी माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथ, उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर यांच्यावर प्रत्येकी एका वर्षाची बंदी लावण्यात आली, तर माजी प्रशिक्षक डॅरेन लेहमन यांनी पद सोडल्यानंतर लँगर जबाबदारी स्वीकारत आहे, हे विशेष.

लँगर म्हणाला, ‘आॅस्ट्रेलियाकडून अनेक अपेक्षा आहेत. सर्व खेळाडूंचे वर्तन चांगले झाले तरच चांगल्या निकालाची अपेक्षा करता येईल. सन्मानाशिवाय जगात काहीही नसल्याने गमावलेला सन्मान पुन्हा मिळवायचा आहे. प्रतिस्पर्धी असणे आणि आक्रमक होणे यात कमालीचे अंतर आहे.’ वॉर्नर, स्मिथ आणि बेनक्रॉफ्ट यांच्या पुनरागमनची शक्यता असल्याचे संकेत देत लेंगर म्हणाला,‘आम्ही सर्वच चुकांपासून बोध घेतो. अशा चुका होणे आश्चर्यकारक आहे.आॅस्ट्रेलिया संघ यंदाच्या मोसमात भारतासह अनेक संघांचे यजमानपद भूषविणार आहे. त्यावेळी आम्हाला माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथ व माजी उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर यांची उणीव भासेल, अशी कबुली लँगर यांनी दिली. या दोघांव्यतिरिक्त युवा कसोटी सलामीवीर फलंदाज कॅमरुन बेनक्रॉफ्ट यालाही अलीकडेच घडलेल्या चेंडू छेडछाड प्रकरणात निलंबित करण्यात आले आहे.२०१४ पासून आॅस्ट्रेलियाच्या कसोटी धावांमध्ये ३७ टक्के योगदान देणाऱ्या स्मिथ व वॉर्नर यांची उणीव भरुन काढण्यासाठी काय योजना आहे, याबाबत बोलताना लँगर म्हणाले,‘त्यांच्या धावा व अनुभव याचा पर्याय शोधणे कठीण आहे. आगामी ११ महिने काही खेळाडूंसाठी ही संधी राहील. त्याचा त्यांनी लाभ घ्यायला हवा. आम्हाला संघाला मजबुती प्रदान करावी लागेल.’भारतात जिंकल्यानंतरच महानसंघाचा दर्जा मिळेल - जस्टिन लँगरभारतात कसोटी मालिका जिंकल्यानंतरच आम्हाला महान संघाचा दर्जा मिळेल, अशी प्रतिक्रिया आॅस्ट्रेलियाचे नवनियुक्त प्रशिक्षक जस्टिन लँगर यांनी दिली. या कामगिरीची तुलना त्यांनी माऊंट एव्हरेस्ट सर करण्यासारखे आहे, असे केली. यापूर्वी आॅस्ट्रेलियाने २००४ मध्ये भारतात कसोटी मालिका जिंकली होती.डॅरेन लेहमनच्या स्थानी आॅस्ट्रेलियन संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी सांभाळणाºया लँगर यांच्यापुढे अनेक प्रतिष्ठेच्या स्पर्धांचे आव्हान आहे, पण त्यांच्यासाठी भारतीय उपखंडाचा दौरा सर्वांत मोठे आव्हान आहे. लँगर पत्रकार परिषदेत म्हणाले, ‘आम्हाला विश्वकप, टी-२० विश्वकप आणि दोन अ‍ॅशेस (२०१९ व २०२१-२२) मालिका खेळायच्या आहेत. याबाबत ज्यावेळी मी विचार करतो त्यावेळी निराश होतो. भविष्याबाबत विचार करता तीन-चार वर्षानंतर होणारा भारतीय कसोटी दौरा (२०१२) माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. जर आम्ही भारताला भारतात पराभूत करू शकलो तर आमचा संघ महान आहे किंवा नाही, याचा निर्णय घेता येईल.’लँगर २००४ मध्ये अ‍ॅडम गिलख्रिस्टच्या नेतृत्वाखाली भारतात कसोटी मालिकेत २-१ ने विजय मिळवणाºया संघाचे सदस्य होते आणि त्यांच्या मते हा विजय माऊंट एव्हरेस्ट सर करण्याप्रमाणे होता. भारतात विजय मिळवला तर मनोधैर्य ढासळलेल्या आॅस्ट्रेलियन संघाचा आत्मविश्वास उंचावण्यास मदत मिळेल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.लँगर म्हणाले, ‘मी कारकिर्दीचा विचार केला तर माऊंट एव्हरेस्ट सर केल्याप्रमाणे आनंद २००४ मध्ये मिळाला. त्यावेळी आम्ही अखेर भारताला भारतात पराभूत करण्यात यशस्वी ठरलो. आम्हाला विदेशात चांगली कामगिरी करावी लागेल. विदेश व स्वदेशात चांगली कामगिरी केली तरच आमचा संघ महान ठरेल आणि ते आमचे लक्ष्य आहे.’

टॅग्स :आॅस्ट्रेलिया