लीड्स : बेंचवरून येत सरळ दबाव असणाऱ्या सामन्यात चांगला खेळ करणे सोपे नसते. आणि इंग्लंड विरोधातील तिसºया एकदिवसीय सामन्यात मला याचा सामना करावा लागला, असे भारताचा जलदगती गोलंदाज शार्दुल ठाकूर याने म्हटले आहे. अखेरच्या सामन्यात ठाकूर याला सिद्धार्थ कौलच्या जागी संधी देण्यात आली. ठाकूर म्हणाला की, ‘मी दक्षिण आफ्रिकेत अखेरचा सामना खेळलो. तेव्हा आम्ही मालिका जिंकली होती. या सामन्यात मी थोडा नर्व्हस होतो. कारण निर्णायक सामना होता. आणि दबावाच्या स्थितीत खेळाडूवर सर्वोत्तम खेळ करण्याची जबाबदारी होती.’