Join us  

Big Breaking : बीसीसीआयनं वार्षिक करारातून महेंद्रसिंग धोनीचं नाव वगळलं

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून बराच काळ दूर आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2020 2:11 PM

Open in App

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून बराच काळ दूर आहे. वन डे वर्ल्ड कप स्पर्धेनंतर धोनी एकही सामना खेळलेला नाही. त्यामुळे त्याच्या निवृत्तीच्या चर्चा रंगत आहेत. त्यालाच खतपाणी घालणारी बातमी भारतीय क्रिकेट नियमाक मंडळाच्या ( बीसीसीआय) मुख्यालयातून आली. बीसीसीआयनं गुरुवारी ऑक्टोबर 2019 ते सप्टेंबर 2020 या कालावधीसाठी वार्षिक करारातील खेळाडूंची नावं जाहीर केली. त्यात धोनीचं नाव वगळल्याचं निदर्शनास येत आहे. बीसीसीआयनं जाहीर केलेल्या करारात मयांक अग्रवाल, नवदीप सैनी, श्रेयस अय्यर, वॉशिंग्टन सुंदर आणि दीपक चहर यांना करार देण्यात आले आहे. 

कोणाला किती रक्कम मिळणारए+ ग्रेड - 7 कोटीए ग्रेड - 5 कोटीबी ग्रेड - 3 कोटीसी ग्रेड - 1 कोटी

  • ए + ग्रेड - विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह
  • ए ग्रेड - रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, भुवनेस्वर कुमार, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, लोकेश राहुल, शिखर धवन,  मोहम्मद शमी, इशांत शर्मा, कुलदीप यादव, रिषभ पंत
  • बी ग्रेड - वृद्धीमान साहा, उमेश यादव, युजवेंद्र चहल, हार्दिक पांड्या, मयांक अग्रवाल
  • सी ग्रेड - केदार जाधव, नवदीप सैनी, दीपक चहर, मनिष पांडे, हनुमा विहारी, शार्दूल ठाकूर, श्रेयस अय्यर, वॉशिंग्टन सुंदर 
  • लोकेश राहुलला बी गटातून अ गटात बढती मिळाली
  • वृद्धीमान साहाही सी गटातून बी गटात गेला

धोनीनं 90 कसोटी सामन्यांत 38.09 च्या सरासरीनं 6 शतकं व 33 अर्धशतकांसह 4876 धावा केल्या आहेत. 350 वन डे क्रिकेटमध्ये त्याची सरासरी ही 50.57 इतकी आहे. त्याच्या 10773 धावांत 10 शतकं व 73 अर्धशतकांचा समावेश आहे. ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये त्यानं 98 सामन्यांत 1617 धावा केल्या आहेत. यष्टिरक्षणात कसोटीत त्याच्या नावावर 256 झेल व 38 स्टम्पिंग, वन डेत 321 झेल व 123 स्टम्पिंग आणि ट्वेंटी-20त 57 झेल व 34 स्टम्पिंग आहेत. 

टॅग्स :महेंद्रसिंग धोनीबीसीसीआयमयांक अग्रवालशार्दुल ठाकूर