Join us  

Big News : CSK पाठोपाठ IPL 2020मधील आणखी एका संघातील सदस्य कोरोना पॉझिटिव्ह

IPL 2020 :गतविजेता मुंबई इंडियन्स आणि तीन वेळचा विजेत्या चेन्नई सुपर किंग्स यांच्यात सलामीचा सामना होणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2020 10:49 PM

Open in App

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल) 13व्या पर्वाचे वेळापत्रक रविवारी जाहीर करण्यात आले. गतविजेता मुंबई इंडियन्स आणि तीन वेळचा विजेत्या चेन्नई सुपर किंग्स यांच्यात सलामीचा सामना होणार आहे. चेन्नई सुपर किंग्सच्या दोन खेळाडूंसह सपोर्ट स्टाफमधील 11 सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यामुळे आयपीएलवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला होता. पॉझिटिव्ह आढळलेले खेळाडू व सदस्य अजूनही क्वारंटाईन आहेत. त्यात आणखी एका संघातील सदस्य कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे वृत्त समोर आले आहे. त्यामुळे आता आयपीएलमधील सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. 

IPL 2020 : फ्रँचायझींची क्रिएटीव्हिटी; प्रतिस्पर्ध्यांवर कुरघोडी करण्याची संधी इथेही दवडली नाही, Video

दीपक चहर आणि ऋतुराज गायकवाड यांच्यासह सपोर्ट स्टाफमधील सदस्य कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत. ही सर्व क्वारंटाईन झाली आहेत. पण, CSKच्या अन्य खेळाडूंचा रिपोर्ट मात्र निगेटिव्ह आल्यामुळे त्यांनी सरावाला सुरुवात केली. त्यात आता दिल्ली कॅपिटल्सच्या सहाय्यक फिजिओथेरपिस्टचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. फ्रँचायझीनं या वृत्ताला दुजोरा दिला आहे. पण, हा सदस्य खेळाडू किंवा अन्य कोणाच्याही संपर्कात आला नसल्याचेही फ्रँचायझीकडून स्पष्ट करण्यात आले.

IPL 2020 : सुरेश रैना, भज्जीच्या माघारीनं CSKचं टेंशन वाढवलं; महेंद्रसिंग धोनीच्या संघाचं संपूर्ण वेळापत्रक

IPL 2020 : मुंबई इंडियन्स कोणाशी व कधी भिडणार, जाणून घ्या रोहित शर्माच्या संघाचं संपूर्ण वेळापत्रक

IPL 2020 : रोहित शर्मा अऩ् महेंद्रसिंग धोनी यांच्यात सलामीला टक्कर; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर

दुबईत आल्यावर त्याचे दोन रिपोर्ट निगेटिव्ह आले, परंतु तिसरा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे फ्रँचायझींनी सांगितले. आता त्यांना आयसोलेशनमध्ये राहण्यास सांगण्यात आले आहे.  

दिल्ली कॅपिटल्सचं वेळापत्रक20 सप्टेंबर, रविवार - दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाब, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, दुबई25 सप्टेंबर, शुक्रवार - चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स,  सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, दुबई29 सप्टेबंर, मंगळवार - दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, अबु धाबी3 ऑक्टोबर, शनिवार, दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, शारजाह5 ऑक्टोबर, सोमवार - रॉयल चॅलेंजर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, दुबई9 ऑक्टोबर, शुक्रवार - राजस्थान ऱॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, शारजाह11 ऑक्टोबर, रविवार - मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, अबु धाबी14 ऑक्टोबर, बुधवार - दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, दुबई17 ऑक्टोबर, शनिवार - दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, शारजाह20 ऑक्टोबर, मंगळवार - किंग्स इलेव्हन पंजाब विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, दुबई24 ऑक्टोबर, शनिवार - कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, दुपारी 3.30 वाजल्यापासून, अबु धाबी27 ऑक्टोबर, मंगळवार - सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, दुबई31 ऑक्टोबर, शनिवार - दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, दुपारी 3.30 वाजल्यापासून, दुबई2 नोव्हेंबर, सोमवार - दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, अबु धाबी

दिल्ली कॅपिटल्सचा संघश्रेयस अय्यर, रिषभ पंत, शिखर धवन, कागिसो रबाडा, पृथ्वी शॉ, अजिंक्य रहाणे, आर अश्विन, इशांत शर्मा, अमित मिश्रा, किमो पॉल, एच पटेल, अक्षर पटेल, एस लामिचाने, ए खान, जेसन रॉय, ख्रिस वोक्स, अॅलेक्स केरी, शिमरोन हेटमायर, मोहित शर्मा, तुषार देशपांडे, मार्कस स्टॉयनिस, एल यादव.

टॅग्स :आयपीएल 2020चेन्नई सुपर किंग्सकोरोना वायरस बातम्यादिल्ली कॅपिटल्स