Join us  

मेजर अपडेट्स! जसप्रीत बुमराहपाठोपाठ मुंबई इंडियन्सचा आणखी एक गोलंदाज वर्ल्ड कप खेळणार

ICC World Cup 2023 : भारतात ५ ऑक्टोबर ते १७ नोव्हेंबर या कालावधीत वन डे वर्ल्ड कप होणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2023 7:09 PM

Open in App

ICC World Cup 2023 : भारतात ५ ऑक्टोबर ते १७ नोव्हेंबर या कालावधीत वन डे वर्ल्ड कप होणार आहे. जलदगती जसप्रीत बुमराह वर्ल्ड कप स्पर्धेसाठी तंदुरुस्त होईल, असे अपडेट कालच बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी दिले. त्यामुळे भारतीय चाहते आनंदात आहेत. अशात मुंबई इंडियन्सचा आणखी एक जलदगती गोलंदाज वर्ल्ड कप स्पर्धेसाठी पूर्णपणे तंदुरुस्त होणार असल्याचे अपडेट्स समोर येत आहेत, परंतु हा गोलंदाज भारतीय संघाचा नाही. इंग्लंडचा जलदगत गोलंदाज जोफ्रा आर्चर ( Jofra Archer )  याच्या फिटनेसबाबत हे अपडेट्स आले आहेत. ससेक्स क्लबचे प्रशिक्षक पॉल फॅब्रास यांनी ही माहिती दिली आहे.  

    ५ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत १० संघ सहभागी होणार आहेत. २०१९च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत इंग्लंडने अखेरच्या क्षणाला न्यूझीलंडचा पराभव करून जेतेपद पटकावले होते. आता इंग्लंड जेतेपद कायम राखण्यासाठी मैदानावर उतरणार आहे आणि या संघासाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. जोफ्रा आर्चर वर्ल्ड कप खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. आर्चरने इंग्लंडला वन डे वर्ल्ड कप २०१९ ट्रॉफी जिंकण्यात मदत केली होती. या स्पर्धेत त्याने ११ सामन्यांमध्ये २० विकेट्स घेतल्या होत्या, परंतु कोपरच्या दुखापतीमुळे, तो जवळजवळ दोन वर्षे क्रिकेटच्या मैदानापासून दूर होता. 

त्यानंतर पुनरागमन करताना त्याने २०२३ मध्ये ४ वन डे आणि ३ ट्वेंटी-२० सामने सामने खेळले आहेत.  ससेक्सचे प्रशिक्षक पॉल फारब्रेस यांनी सांगितले की जोफ्रा आर्चर आधीच तंदुरुस्त आहे आणि त्याला वाटते की तो वर्ल्ड कप खेळण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. आर्चरला पाठीच्या दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अॅशेस मालिकेला मुकावे लागले होते.  

टॅग्स :वन डे वर्ल्ड कपजोफ्रा आर्चर
Open in App