Join us  

सुवर्णसंधी! टीम इंडियाच्या खेळाडूंना जवळून पाहण्याचा मोठा चान्स; BCCIसोबत काम करण्यासाठी निघालीय जाहीरात

Jobs Alert : भारतीय क्रिकेटपटूंना जवळून पाहणं... आपल्या कार्यालयात क्रिकेटपटूंचा वावर असले तर कोणाला आवडणार नाही..

By ऑनलाइन लोकमत | Published: December 08, 2021 1:10 PM

Open in App

Jobs Alert : भारतीय क्रिकेटपटूंना जवळून पाहणं... आपल्या कार्यालयात क्रिकेटपटूंचा वावर असले तर कोणाला आवडणार नाही.. आतापर्यंत केवळ टीव्हीवरून व स्टेडियमवर दूरून कुठेतरी बसून खेळाडूंना पाहातो, पण बीसीसीआयनं पोस्ट केलेल्या नोकरीच्या जाहीरातीनंतर भारतीय क्रिकेटपटूंना जवळून पाहण्याची सुवर्णसंधी तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही ज्या कार्यालयात काम कराल तिथे भारतीय क्रिकेटपटू दिसणं हे रोजचंच असणार आहे, मग अशी संधी दवडायची कशाला.

BCCIनं मंगळवारी General Manager – Marketing & Commercial या पदासाठी अर्ज मागवले आहेत. १६ डिसेंबरपर्यंत इच्छुकांना recruitment@bcci.tv या ई-मेलवर सायंकाळी ५ वाजण्यापूर्वी अर्ज करायचे आहेत. 

पात्रता

  • अर्जदारानं MBA पदवी घेतलेली हवी.
  • त्याच्याकडे १५ वर्षांचा कामाचा अनुभव असावा, त्यापैकी ३ वर्ष त्यानं किमान प्रतिष्ठीत कंपनीत मार्केटींग विभागाचा प्रमुख म्हणून काम केलेलं असावं.
  • बिझनस प्लानची आखणी व विकासाचा प्लान त्याच्याकडे असावा. क्लाईंटसोबत सुसंवाद राखण्याचे कौशल्या

टॅग्स :नोकरीबीसीसीआय
Open in App