Join us

जसप्रीत बुमराह दुसऱ्या कसोटीलाही मुकणार

इंग्लंडविरुद्धच्या दुस-या सामन्यातही भारतीय संघाला दुखापतीचा फटका कायम बसणार असून हुकमी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह या सामन्यात खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 04:22 IST

Open in App

लंडन : इंग्लंडविरुद्धच्या दुस-या सामन्यातही भारतीय संघाला दुखापतीचा फटका कायम बसणार असून हुकमी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह या सामन्यात खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. हाताच्या बोटाचे फ्रॅक्चर अद्याप ठीक झाले नसल्याने तो या सामन्यासाठी निवड चाचणीसाठी उपलब्ध राहणार नसल्याचे भारतीय संघ व्यवस्थापनाने स्पष्ट केले.जून महिन्यात झालेल्या आयर्लंडविरुद्धच्या टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यादरम्यान बुमराहला ही दुखापत झाली होती. याआधी बीसीसीआयने सांगितले होते की, ‘तंदुरुस्त असल्यास बुमराह दुसºया सामन्यासाठी उपलब्ध राहील.’ मात्र अद्यापही दुखापतीतून सावरलेला नसल्याने बुमराह दुसºया कसोटीत खेळणार नाही. याविषयी भारतीय गोलंदाज प्रशिक्षक भरत अरुण म्हणाले की, ‘बुमराह गोलंदाजी करण्यास तंदुरुस्त आहे. परंतु, त्याला आता सामन्यात खेळविणे घाईचे ठरेल. सर्वप्रथम त्याच्या हातावरील प्लास्टर काढावे लागेल. तो दुसºया कसोटी सामन्यासाठी उपलब्ध नसेल.’ बुमराहने नेटमध्ये गोलंदाजीचा सराव केला. मात्र, झेल घेताना मात्र त्याने सॉफ्ट चेंडू वापरला.